AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deodhar Trophy Final 2023 | साऊथ झोन देवधर ट्रॉफी चॅम्पियन, रियान पराग याची झुंज व्यर्थ

Deodhar Trophy Final 2023 South Zone vs East Zone | देवधर ट्रॉफी महाअंतिम सामन्यात साऊथ झोन विजयी झाली आहे. साऊथ झोनने ईस्ट झोनवर 45 धावांनी विजय मिळवला.

Deodhar Trophy Final 2023 | साऊथ झोन देवधर ट्रॉफी चॅम्पियन, रियान पराग याची झुंज व्यर्थ
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 03, 2023 | 10:11 PM
Share

पुद्देचरी | साऊथ झोन क्रिकेट टीमने देवधर ट्रॉफी जिंकली आहे. साऊथ झोनने ईस्ट झोनवर अंतिम सामन्यात 45 धावांनी विजय मिळवला आणि देवधर ट्रॉफीवर नाव कोरलं. साऊथ झोनने ईस्ट झोनला विजयासाठी 329 धावांचं आव्हान दिलं होतं. ईस्ट झोननेही चांगली झुंज दिली. मात्र ईस्ट झोन 46.1 ओव्हरमध्ये 283 धावांवर ऑलआऊट झाली. ईस्ट झोनकडून रियान पराग याने झुंजार खेळी करत एकाकी झुंज दिली.मात्र रियानला दुसऱ्या बाजूने कुमार कुशाग्रा याचा अपवाद वगळता एकाचीही साथ मिळाली नाही.

ईस्ट झोनकडून रियान पराग याने एकाकी खिंड लढवली. तर कुमार कुशाग्रा यानेही चांगली कामगिरी केली. यामुळे सामना शेवटपर्यंत जाऊ शकला. ईस्ट झोनकडून रियान पराग याने 95 धावांची खेळी केली. तर कुमार कुशाग्रा याने 68 रन्स केल्या. सुदीप घरामी याने 41 धावा जोडल्या. तर कॅप्टन सौरभ तिवारी 28 धावा करुन तंबूत परतला. शहबाज अहमदने 17 रन्स केल्या. तर या 5 जणांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.आकाश दीप 7 धावांवर नाबाद राहिला.

साऊथ झोनकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. विद्वत कवेरप्पा, वासुकी कौशिक आणि विजयकुमार विशक या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रविश्रीनिवासन साई किशोर याने 1 विकेट घेतली.

दरम्यान त्याआधी साऊथ झोनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहन कुन्नम्मल याच्या शतक आणि एन जगदीसन याच्या अर्धशतकाच्या जोरावर साऊथ झोनने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 328 धावा केल्या. शाहबाज अहमद, रियान पराग आणि उत्कर्ष सिंह या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एम मुरासिंह आणि आकाश दीप या दोघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.

साऊथ झोनने देवधर ट्रॉफी जिंकली

साऊथ झोन प्लेईंग इलेव्हन | मयंक अग्रवाल (कॅप्टन), अरुण कार्तिक, रोहन कुन्नम्मल, साई सुधरसन, एन जगदीसन (विकेटकीपर), रोहित रायडू, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, वासुकी कौशिक, विजयकुमार विशक आणि विद्वत कवेरप्पा.

ईस्ट झोन प्लेईंग इलेव्हन | सौरभ तिवारी (कॅप्टन), अभिमन्यू ईश्वरन, उत्कर्ष सिंग, विराट सिंग, रियान पराग, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मणिशंकर मुरासिंग, आकाश दीप, सुदीप कुमार घरामी आणि मुख्तार हुसेन.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?