
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अमिरिकेमधील सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह याने आपल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर यश मिळवलं. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा आमनेसामने आलेल्या भारत अमेरिकेच्या सामन्याची सुरूवात अशा दमदार अंदाजामध्ये झाली आहे. अर्शदीप सिंह याने ओपनिंगसाठी उतरलेल्या शायन जहांगीर याला पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आऊट केलं.
No team India & arshdeep Singh fan will pass without like & comment this….😊👏👏
Tell me guy’s how many runs will usa score?#INDvsUSA pic.twitter.com/WVyNegt30j
— Ask (@loyalfan_07) June 12, 2024
टी-२० वर्ल्ड कपमध्ये अर्शदीप सिंग हा सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आहे. त्याच्याआधी बांगलादेशचा मशरफी मुर्तझा आणि अफगाणिस्तानचा शापूर जद्रान यांनीही ही कामगिरी केली आहे. तर नामिबियाच्या रुबेन ट्रम्पलमॅनने T20 विश्वचषक सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेतली आहे. मोर्तझा आणि जद्रान यांनी 2014 मध्ये ही कामगिरी केली होती.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सार्थ ठरवत अर्शदीप सिंहनेही पहिल्याच बॉलवर संघाला यश मिळवून दिलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (डब्ल्यू), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.