IND vs CAN: टीम इंडिया-कॅनडा सामन्याबाबत मोठी अपडेट, बीसीसीआयने काय सांगितलं?

India vs Canada: टीम इंडिया कॅनडावर मात करत विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज आहे. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.

IND vs CAN: टीम इंडिया-कॅनडा सामन्याबाबत मोठी अपडेट, बीसीसीआयने काय सांगितलं?
ind vs can florida
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 15, 2024 | 7:37 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने सलग 3 सामने जिंकले आहेत. टीम इंडिया आता साखळी फेरीतील चौथा आणि अखेरचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया कॅनडा विरुद्ध भिडणार आहे. तसेच कॅनडा टीमचाही हा चौथा आणि शवटचा सामना आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस आणि 8 वाजता सुरुवात अपेक्षित आहे. मात्र त्याआधी सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन माहिती दिली आहे.

ओल्या आऊटफिल्डमुळे सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे सामन्याला विलंबाने सुरुवात होणार असल्याचं निश्चित झालं आहे. नियोजित वेळेनुसार सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र ओल्या आऊट फिल्डमुळे रात्री 8 वाजेपर्यंत टॉसही होणार नाहीय. पंचांकडून 8 वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने सोशल मीडियावरुन दिली आहे.

सुदैवाने स्टेडियम परिसरात पाऊस नाहीय. पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र मैदान अजूनही कव्हरने झाकलेलं आहे. याच मैदानात 14 जून रोजी यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना रद्द करण्यात आला होता. आता टीम इंडिया-कॅनडा सामन्यालाही विलंब झालाच आहे. रात्री 8 वाजता पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पंच 8 वाजता पाहणीनंतर काय निर्णय घेतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

रात्री 8 वाजता होणार पाहणी

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

कॅनडा क्रिकेट टीम: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉनसन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), डाइलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, ऋषीव जोशी, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किरटन, प्रगत सिंह, रविंद्रपाल सिंह आणि रेयानखान पठान.