
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. भारतासमोर दुबळा आयर्लंड संघ असला तरी त्याला कमी लेखून चालणार नाही. कारण न्यूयॉर्कमधील खेळपट्टी आणि तिथल्या मागच्या सामन्यांचा निकाल पाहता हा खेळ वाटतो तितका सोपा नाही. न्यूयॉर्कमधील नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी एक गूढ आहे. या खेळपट्टी मोठी धावसंख्या होणं कठीण दिसत आहे. असं असताना सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला 60 धावांनी पराभूत केलं आहे. यावेळी 15 पैकी 12 खेळाडू खेळले होते. त्यामुळे आता राहुल द्रविड आणि रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा देणार? हा प्रश्न समोर आला आहे. सराव सामन्यात विराट कोहली खेळला नव्हता. तो आता प्लेइंग 11 चा भाग असेल यात शंका नाही. या सर्व पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी प्लेइंग इलेव्हन जारी केली आहे.
“मला टीम निवडणं खरंच आवडणारं नाही, कारण मी सर्वांकडून हवा तसा समाधानी नाही”, असं सुनील गावस्कर याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं. “प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणचातरी आवडता प्लेयर निवडला जाणार नाही. मी आयर्लंडविरुद्ध प्लेइंग 11 निवडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.”, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.
“रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.”, सुनिल गावस्कर यांनी ही प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. ही प्लेइंग इलेव्हन निवडण्याचं कारण मात्र त्यांनी सांगितलं नाही. पण रोहित शर्मासोबत विराट कोहलीने ओपनिंग उतरावं असा सल्ला त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालला इतरांनी डावललं असताना सुनिल गावस्कर यांनी त्याला तिसऱ्या स्थानावर उतरण्यास पसंती दिली.
#SunilGavaskar opts for experience with @imVkohli & @ImRo45 at the 🔝
A surprise inclusion at number 3, plenty of batting options and two pacers! 😮
What changes would you make to this team?
📺 | #INDvIRE | 5th June, 6 PM | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/6hQx6EJmhD
— Star Sports (@StarSportsIndia) June 4, 2024
सुनिल गावस्कर यांनी डावखुरा अर्शदीप सिंग याला प्लेइंग इलेव्हनमधून डावललं आहे. सराव सामन्यात अर्शदीप सिंगने तीन षटकं टाकत 12 धावा देत 2 गडी बाद केले होते. तसेच सराव सामन्यात संजू सॅमसन फेल झाल्याने त्याची निवड झाली नाही हे तितकंच खरं आहे. आयर्लंडविरुद्ध निवडलेली प्लेइंग इलेव्हनच पुढच्या सामन्यात कायम दिसली तर आश्चर्य वाटायला नको. भारताच्या गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत.