
टीम इंडियाने सुपर-8 फेरीमधील सामन्यात ऑस्ट्रलिया संघाचा पराभव करत सेमी फायनल गाठली आहे. टीम इंडियाने कायम डोकदुखी ठरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला चारीमुंड्या चीत केलं. टीम इंडियासाठी ट्रॅव्हिस हेड परत एकदा व्हिलन ठरत होता पण संकटमोचक बुमराहने त्याला आऊट करत सामना भारताच्या पारड्यात पुर्णपणे झुकवला.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 205-5 धावा केल्या होत्या. यामध्ये रोहित शर्मा याने सर्वाधिक 41 बॉलमध्ये 92 धावा केल्या. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 8 सिक्सर मारले.

टीम इंडियाच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कांगारूंची सुरूवात खराब झाली होती. कांगारूंनी विकेट गमावल्या पण सामन्यात शेवटपर्यंत रंगत ठेवली.

ट्रॅव्हिस हेडने परत एकदा 76 धावांची झुंजार खेळी केली, पण तो सामना जिंकवू शकला नाही. अखेर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 181-7 करता आल्या.

टीम इंडियाने आता सेमी फायनल गाठली आहे. टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये इंग्लंड संघासोबत 27 जूनला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या सामन्यात पाऊस आला तरी टीम इंडियाला आयसीसी रँकिंकमध्ये एक नंबरला असल्याने फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे.