
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 21 व्या सामन्यात डी ग्रुपमधईल दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मारक्रम याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेत बांगलादेशला फिल्डिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशला टॉस गमावल्यानंतरही हवं ते मिळालं. मी टॉस जिंकला असता तर फिल्डिंगचा निर्णय घेतला असता, असं बांगलादेश कॅप्टन नजमूल हौसेन शांतो याने टॉसनतंतर म्हटलं.
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन एडन मारक्रम याने आपल्या 10 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. सौम्य सरकार हा खेळत नाहीय. तर सौम्य सरकार याच्या जागी अंतिम 11 खेळाडूंमध्ये जाकेर अली याला संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने विजयी सलामी दिली आहे. दोन्ही संघ अजिंक्य आहेत. आता दक्षिण आफ्रिकेला बांगलादेश विरुद्ध विजय मिळवून हॅट्रिक करण्याची संधी आहे. आता या प्रयत्नात दोघांपैकी कोणती टीम यशस्वी ठरणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 8 टी 20 सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या 8 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टी 20 वर्ल्ड कप इतिहासात उभयसंघात झालेल्या तिन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकाच विजय ठरली आहे. त्यामुळे बांगलादेश दक्षिण आफ्रिके विरुद्ध विजयाचं खातं उघडणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हौसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, जाकेर अली, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया आणि ओटनील बार्टमन.