USA vs IRE Rain: यूएसए-आयर्लंड सामन्याबाबत मोठी अपडेट, सामना होणार की नाही?

United States vs Ireland Rain: यूनायटेड स्टेटस विरुद्ध आयर्लंड सामन्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हा सामना पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

USA vs IRE Rain: यूएसए-आयर्लंड सामन्याबाबत मोठी अपडेट, सामना होणार की नाही?
usa vs ire rain floridaImage Credit source: Icc X account
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 9:29 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात यूनायटेड स्टेट्स विरुद्ध आयर्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. यूएसएचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. तर आयर्लंडचा तिसरा सामना आहे. यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे आयोजित करण्यात आला आला आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे सामन्याला रात्री 9 वाजेपर्यंततरी सुरुवात झालेली नाही. या सामन्याच्या निकालाकडे पाकिस्तानचं लक्ष आहे. कारण हा सामना रद्द झाला तरी यूएसए सुपर 8 मध्ये पोहचणारी टीम इंडियानंतर दुसरी टीम ठरेल. तसेच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल. अशात या सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

दोन्ही पंच आणि सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरी या तिघांनी रात्री 9 वाजता खेळपट्टीची पाहणी केली. बरेच मिनिटं या तिघांनी चर्चा केली. त्यानंतर एका तासाने अर्थात 10 वाजता पुन्हा खेळपट्टीची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानची धाकधुक वाढली आहे. हा सामना व्हावा, अशी पाकिस्तान आणि क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. मात्र आता तेच होणार जे व्हायचंय. त्यामुळे रात्री 10 नंतर काय निर्णय घेतला जातो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

यूएसए-आयर्लंड सामन्याबाबत मोठी अपडेट

आयर्लंड टीम: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग, ​​बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर.

युनायटेड स्टेट्स टीम: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.

Non Stop LIVE Update
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.