टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी पाकिस्तानी महिला संघाची घोषणा, 15 चेंडूत अर्धशतक ठोकणारा खेळाडू कर्णधार

Women's T20 World Cup 2026: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यात 24 वर्षीय खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी पाकिस्तानी महिला संघाची घोषणा, 15 चेंडूत अर्धशतक ठोकणारा खेळाडू कर्णधार
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी पाकिस्तानी महिला संघाची घोषणा, 15 चेंडूत अर्धशतक ठोकणारा खेळाडू कर्णधार
Image Credit source: ICC
| Updated on: May 16, 2026 | 6:08 PM

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्पर्धेत सहभागी असलेल्या संघांकडून 15 सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली जात आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंडने सर्वप्रथम संघ जाहीर केला. त्यानंतर न्यूझीलंड, भारत आणि इतर संघांची घोषणा करण्यात आली. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. 24 वर्षीय अष्टपैलू फातिमा सनाच्या हाती पाकिस्तान संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. फातिमाच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. तिने फक्त 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्यामुळे तिची कामगिरी आणि क्षमता पाहता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिच्यावर कर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

पाकिस्तान संघात पाच नव्या खेळाडूंना संधी

पाकिस्तानने निवडलेल्या 15 खेळाडूंपैकी पाच खेळाडू या स्पर्धेत पहिल्याच पहिल्यांदाच खेळणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेत डेब्यू करणार आहेत. यात एयमन फातिमा, नतालीया परवेज, रामीन शमीम, सैरा जाबीन आणि तस्मिया रूबाब यांचा समावेश आहे. या खेळाडूंना या स्पर्धेत पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर टॉप ऑर्डर मजबूत करण्यासाठी गुल फेरोजा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तिने झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत दोन शतकं ठोकली होती. गूल या स्पर्धेत दुसऱ्यांदा खेळणार आहे. तर अनुभवी विकेटकीपर फलंदाज मुनीबा अली आणि आयशा जफर ओपनिंग करतील.

मधल्या फळीची जबाबदारी नतालीया परवेज, इरम जावेद, अलीया रियाज आणि सैरा जाबीन यांच्यावर आहे. हे खेळाडू सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे त्यांच्यावर निवड करताना विश्वास टाकला आहे. तर पाकिस्तानची गोलंदाजी ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. फिरकीची जबाबदारी सादिया इकबाल, नशरा संधु, तुबा हसन आणि रामीन शमीन हे करतील. वेगवान गोलंदाजीची धुरा कर्णधार फातिमा सना, डायना बेग आणि तस्मिया रूबाब यांच्यावर असेल.

पाकिस्तानचा महिला संघ : फातिमा सना (कर्णधार), गुल फेरोजा, आयशा जफर, इरम जावेद, एयमन फातिमा, अलीया रियाज, नतालीया परवेज, सैरा जाबीन, मुनीबा अली, तुबा हसन, रामीन शमीम, सादिया इकबाल, नशरा संधु, डायना बेग, तस्मिया रुबाब.

Follow Us