IND vs SA : डेविड मिलरची मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी, वरुण चक्रवर्तीला केलं गिऱ्हाईक; पण..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत दक्षिण अफ्रिका सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. पण धडाधड विकेट पडल्याने बॅकफूटवर आले. पण डेविड मिलरने डाव सावरला.

IND vs SA : डेविड मिलरची मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी, वरुण चक्रवर्तीला केलं गिऱ्हाईक; पण..
IND vs SA : डेविड मिलरची मोक्याची क्षणी अर्धशतकी खेळी, वरुण चक्रवर्तीला केलं गिऱ्हाईक
Image Credit source: Proteas Men Twitter
| Updated on: Feb 22, 2026 | 9:12 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर या सामन्यात दक्षिण अफ्रिकेची सुरूवात काही झाली नाही. आघाडीचे तीन फलंदाज पावरप्लेमध्ये बाद झाले. अवघ्या 20 धावांवर 3 फलंदाज तंबूत होते. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा संघ अडचणीत आला होता. त्यानंतर डेविड मिलर मैदानात आला आणि संघाला अडचणीतून बाहेर काढलं. डेविड मिलरने 26 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 200 चा होता. यात 6 चौकार आणि तीन षटकार मारले. डेविड मिलर यानंतरही थांबला नाही. त्याने गोलंदाजांवर प्रहार सुरूच ठेवला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चेंडू कुठे टाकावा हेच कळेना झालं. डेविड मिलरने 35 चेंडूत 63 धावा केल्या आणि बाद झाला. त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 180 चा होता.

डेविड मिलर फलंदाजीला आला तेव्हा समोर वरूण चक्रवर्ती होता. पहिला चेंडू निर्धाव घालवला. त्यानंतर 2 धावा काढल्या. त्यानंतर दोन चौकार मारले. मिलरने वरूण चक्रवर्तीला लक्ष्य केलं. वरूण चक्रवर्तीच्या तीन षटकात 39 धावा आल्या. डेविड मिलरने यात 23 धावा काढल्या. वरूण चक्रवर्तीच्या पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा आणि तिसऱ्या षटकात 6 धावा आल्या. चौथ्या षटकाचा सामना करण्यासाठी डेविड मिलर पुन्हा समोर होता. या षटकात एक धाव काढली. पण दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक आली तेव्हा विकेट गेली.

डेविड मिलर आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांनी चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी मिळून 50 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. यात डेवॉल्ड ब्रेव्हिसने 26 चेंडूत 43 आणि डेविड मिलरने 26 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर पाचव्या विकेटसाठी डेविड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात 20 चेंडूत 35 धावांनी भागीदारी झाली. यात डेविड मिलरने 10 चेंडूत 17 धावा काढल्या.

टी20 वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्धचं हे चौथं वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी लिटन दासने 2022 मध्ये 21 चेंडूत, 2024 मध्ये हेनरिक क्लासेनने 23 चेंडूत, 2024 मध्ये ट्रेव्हिस हेडने 24 चेंडूत आणि आता डेविड मिलरने 26 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे.