AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA, Super 8 : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल, कुणाचा समावेश?

India vs South Africa Super 8 Toss and Playing 11 : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सुपर 8 सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 4 बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली आहे.

IND vs SA, Super 8 : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल, कुणाचा समावेश?
IND vs SA Super 8 Toss Suryakumar Yadav and Aiden MarkramImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 22, 2026 | 7:29 PM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीत सर्वच्या सर्व 4 सामने जिंकून सुपर 8 मध्ये रुबाबदार एन्ट्री केली. त्यानंतर आता टीम इंडिया सुपर 8 फेरीसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया सुपर 8 फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियासमोर या फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार एडन मार्करम याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडिया या सामन्यात नेदरलँड्स विरुद्धच्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 4 बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून कुणाला संधी मिळालीय हे जाणून घेऊयात. दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये केशव महाराज, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन आणि डेव्हिड मिलर या चौघांचं कमबॅक झालं आहे.

टीम इंडिया चेस करणार

टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत साखळी फेरीतील चारही सामने धावांनी जिंकले आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया चेसिंग करताना विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाचे सलग 12 विजय

दरम्यान टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 12 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 मधील टी 20I वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने त्या स्पर्धेत सलग आणि एकूण 8 सामने जिंकले होते. तर त्यानंतर आता सूर्याच्या नेतृत्वात भारताने या वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतील सलग 4 सामन्यांत विजय मिळवला आहे. अशात आता टीम इंडिया सलग 13 वा सामना जिंकून सुपर 8 मध्ये विजयी सलामी देणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: अभिषेक शर्मा, इशान किशन(विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी

Follow Us
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं