T20 World Cup : भारतानं एकही धाव केली नसती तरीही सामना जिंकला असता कारण…, भाजप नेत्याची पोस्ट व्हायरल

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भारतानं सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्याची पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

T20 World Cup : भारतानं एकही धाव केली नसती तरीही सामना जिंकला असता कारण..., भाजप नेत्याची पोस्ट व्हायरल
T20 World Cup
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 09, 2026 | 3:10 PM

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भारतानं सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाच वातावरण आहे. भारत न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता बनला, त्यानंतर आता भारताच्या या विजयावर देशभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. यातील काही प्रतिक्रियांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान लखनऊ उत्तरचे भाजपा आमदार डॉ. नीरज बोरा यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. भारतानं न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला, त्यानंतर बोरा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, ‘मैदानात आदरणीय अमित शाहाजी होते, त्यामुळे भारतानं एकही धाव काढली नसतील तरी भारत आरामात जिंकू शकला असता, 255 चा धावफलक तर आउट ऑफ रीच होता’.

दरम्यान बोरा यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरली आहे. बोरा यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत. अनेकांनी तर या पोस्टवरून बोरा यांची चांगलीच फिरकी घेतली आहे, तर काही जणांनी बोरा यांच्या या पोस्टला राजकारणाशी जोडलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटलं आहे की, तुम्ही बरोबर बोलत आहात, अमित शाह यांनी आक्रमक फलंदाजी केली, त्यामुळेच टीम इंडिया हा वर्ल्ड कप जिंकू शकली. तर इतरही काही युजर्सनी यावर आपल्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

भारत सलग दुसऱ्यांदा विजेता

भारतानं रविवारी अहमदाबादच्या मैदानावर खेळताना इतिहास रचला आहे, भारत सलग दुसऱ्यांदा आणि टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा विश्वविजेता बनला आहे. भारतानं रविवारच्या सामन्यात न्यूझिलंडचा 96 धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला, भारतानं प्रथम फलंदाजी करातना न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात भारतानं विस ओव्हरमध्ये तब्बल 256 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडवर आधीच धावांचं दडपण आलं. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेली न्यूझीलंडची टीम अवघ्या 159 धावात सर्वबाद झाली आणि टीम इंडियानं तब्बल 96 धावांनी हा सामना आपल्या खिशात घातला. यापूर्वी 2024 मध्ये देखील भारतानेच वर्ल्ड कप जिंकला होता.

 

Follow Us