IND vs PAK : रोहित शर्माच्या विसरभोळेपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब! काय झालं पाहा Video

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित शर्माचा विसरभोळेपणा अधोरेखित झाला आहे.नाणेफेक होण्यापूर्वीच रोहित शर्मा काहीतरी विसरल्याचं दिसून आलं. यावेळी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम यालाही हसू आवरता आलं नाही. आता रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs PAK : रोहित शर्माच्या विसरभोळेपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब! काय झालं पाहा Video
Image Credit source: video grab
| Updated on: Jun 09, 2024 | 10:34 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील क्रीडारसिकांची धाकधूक वाढवणारा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु आहे.टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 19 वा सामना अमेरिकतील न्यूयॉर्कमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजून लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे नाणेफेकीचा कौल होण्यास उशीर झाला. पण नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. कायम रोहित शर्मा काही ना काही विसरतो. याची अनेक उदाहरणं भुतकाळात पाहायला मिळाली आहेत. कधी खेळाडूंचं नाव विसरणं, तर कधी नाणेफेकीवेळी काय निर्णय घ्यायचा हेच रोहित शर्मा विसरला आहे. रोहित शर्माच्या विसरभोळेपणाची एक ना अनेक उदाहरणं संघातील खेळाडूंनीही सांगितली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल होण्यास अर्धा तासाचा उशीर झाला.

नाणेफेकीसाठी रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मैदानात उतरले. यावेळी रोहित शर्माने नाणं आपल्या खिशात ठेवलं होतं. पण जेव्हा नाणेफेक करण्याची वेळ आली तेव्हा रोहित शर्माने रेफरीकडे हात केला. पण नंतर लक्षात आलं की नाणं त्याच्याच खिशात आहे. त्याने खिसे चाचपडले आणि नाणं सापडलं. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला हसू आलं. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. दुसरीकडे, पाकिस्तानने एक बदल करत आझम खानला आराम दिला आहे. तर नसीम शाह संघात स्थान दिलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानात उतरली. मात्र हवी तशी सुरुवात या दिग्गज खेळाडूंना करता आली नाही.