AFG vs PAK : पाकिस्तानसमोर पहिलाच पेपर अफगाणिस्तानचा, 29 सप्टेंबरपासून ट्राय सीरिज, कोण मारणार मैदान?

PAK vs AFG 1st T20I Tri Series Live Streaming: टी 20I ट्राय सीरिज राउंड रॉबिन फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. सर्वाधिक सामने जिंकणारे संघ अंतिम फेरीत पोहचतील. या मालिकेतील पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

AFG vs PAK : पाकिस्तानसमोर पहिलाच पेपर अफगाणिस्तानचा, 29 सप्टेंबरपासून ट्राय सीरिज, कोण मारणार मैदान?
PAK vs AFG
Image Credit source: AFP
| Updated on: Aug 28, 2025 | 11:59 PM

आशिया कप स्पर्धेआधी 3 संघात टी 20I ट्राय सीरिजचा थरार रंगणार आहेत. यूएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्राय सीरिजचा थरार रंगणार आहे. आशिया कपच्या पार्श्वभूमीवर तिन्ही संघांसाठी ही मालिका सराव आणि अनेक बाबतीत निर्णायक ठरणार आहे. आशिया कप आणि ट्राय सीरिजचं आयोजन हे यूएईत करण्यात आलं आहे. त्यामुळे यजमान यूएईसह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला आशिया कपआधी परिस्थितीची चांगली माहिती होईल. याचा यजमान यूएईसह इतर दोन्ही संघांना फायदा होऊ शकतो. या ट्राय सीरिजमध्ये 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान एकूण 7 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ 4 सामने खेळणार आहे. सर्व सामने हे एकाच मैदानात आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे तिन्ही संघांचा प्रवासाचा बराच वेळ वाचणार आहे.

ट्राय सीरिजमधील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. स्टार ऑलराउंडर राशीद खान याच्याकडे अफगाणिस्तानच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर सलमान अली आगा पाकिस्तानचं कर्णधारपद सांभाळणार आहे. अफगाणिस्तानने गेल्या काही वर्षात टी 20I क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या संघांना पराभूत केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा?

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना शुक्रवारी 29 ऑगस्टला होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 8 वाजता टॉस होईल.

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

टी 20I ट्राय सीरिज भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहता येईल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 7 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानने 7 पैकी सर्वाधिक 4 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानने 3 वेळा पाकिस्तानवर मात केली आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता उभयसंघात चढाओढ पाहायला मिळणार आहे.