Team India Announcement : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, श्रेयस अय्यर वनडे टीमचा कॅप्टन
India Announce Test and ODI Teams for New Zealand Tour: न्यूझीलंड दौऱ्यावरील एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026 मध्ये होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघांची अधिकृत घोषणा केली आहे. या दौऱ्यावर भारत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एक कसोटी मालिका खेळणार आहे. खेळाडूंच्या कामाच्या ताणाचे व्यवस्थापन लक्षात घेऊन बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेसाठी दोन स्वतंत्र संघांची घोषणा केली आहे.
पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी शुभमन गिलकडे देण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यर उपकर्णधार असेल. शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल. जाहीर झालेल्या संघांमधील सर्वात आश्चर्यकारक निर्णय म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना वगळण्यात आले आहे. या दोन्ही अनुभवी गोलंदाजांचा एकदिवसीय किंवा कसोटी या दोन्ही प्रकारांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
अजित आगरकर यांचा मुख्य निवडकर्ता पदावरून पायउतार झाल्यानंतर हे खेळाडू संघात परत येतील अशी अपेक्षा होती. निवड समितीने वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात जसप्रीत बुमराह (फक्त कसोटी), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांसारख्या युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. या संघ निवडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनला देण्यात आलेली मोठी जबाबदारी.
चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी इशान किशनची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नवीन जबाबदारी इशानच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. शुभमन गिल कसोटी मालिकेचे नेतृत्व करणार असून केएल राहुल त्याचा उपकर्णधार आहे. कसोटी संघात यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या खेळाडूंचा समावेश आहे. एकदिवसीय संघात नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, आकिब नबी, यश ठाकूर आणि कुमार कुशाग्रा यांसारख्या युवा प्रतिभांचाही समावेश आहे.
सुरुवातीच्या 3 वनडेसाठी भारतीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), नितिश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर बराड़, रुतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, ईशान किशन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव
शेवटच्या 2 वनडेसाठी भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर / उपकर्णधार), नितिश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बराड़, रुतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव