बांग्लादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर, दुलीप ट्रॉफीत प्रभाव टाकणाऱ्यांना स्थान

वर्ल्ड टेस्ट चॅमियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या बांगलादेश कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात फारसा काही बदल होईल असं वाटत नाही. 

बांग्लादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर, दुलीप ट्रॉफीत प्रभाव टाकणाऱ्यांना स्थान
| Updated on: Sep 08, 2024 | 9:58 PM

भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचे सामने पार पडताच संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफीत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. निवड केलेला भारतीय संघ 12 सप्टेंबरपासून प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात चेन्नईच्या चेपॉक मैदानात सराव करणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तीन विकेटकीपर बॅट्समन या संघात असणार आहेत. तर आयपीएलमध्ये पाच षटाकर खालेल्या यश दयालला संघात स्थान मिळालं आहे.  य़शस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ध्रुव जुरेल हे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत फेल ठरले होते. पण त्यांचा अनुभव आणि मागचा रेकॉर्ड पाहता संघात स्थान दिल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे, केएल राहुल, ऋषभ पंत, आकाश दीप, अक्षर पटेल, सर्फराज खान यांनी चांगली कामगिरी केली होती. ऋषभ पंतचं जवळपास 22 महिन्यानंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर कसोटी संघात पुनरागमन करेल की नाही याबाबत साशंकता होती. पण ऋषभ पंतने सर्व समस्यांवर मात केली आणि संघात स्थान मिळवलं. आधी टी20 आणि वनडे संघात, त्यानंतर कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. ऋषभ पंतमुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमीच्या चाहत्यांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील एकूण 10 सामने शिल्लक आहेत. त्यापैकी पाच सामने हे मायदेशात होणार आहेत. यात बांगलादेश विरुद्ध पाच, न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने होतील. तर ऑस्ट्रेलियात भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी बांगलादेशला व्हाईट वॉश देणं आवश्यक आहे. पण बांगलादेशची पाकिस्तानमधील कामगिरी पाहून हे वाटतं तितकं सोपं नाही.