इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी ड्रामा, टीम इंडिया नाणेफेकीसाठी मैदानात पोहोचली नाही, कारण…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा टी20 सामना होत आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या सामन्यासाठी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होणार होता. पण टीम इंडिया मैदानात पोहोचली नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारताने ही मालिका आधाची 3-0 ने गमावली आहे. त्यात एकही विजय न मिळाल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताने या सामन्यात चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये काही बदल असतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होता. तर नाणेफेकीचा कौल संध्याकाळी 6.30 वाजता होणार होता. मात्र टीम इंडिया मैदानात पोहोचली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं? याबाबत उत्सुकता वाढली. पण टीम इंडिया ट्राफिकमध्ये अडकल्याने वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल होण्यास उशीर झाला.
नाणेफेकीचा कौल कधी होणार?
भारतीय संघ मैदानात संध्याकाळी 6.35 वाजता पोहोचला. त्यामुळे नाणेफेकीला वेळ होणार हे नक्की झालं. पण नेमकं काय झालं? याबाबत सविस्तर काही कळू शकलेलं नाही. पण नाणेफेकीचा कौल उशिरा झाल्याने सामना सुरू होण्यास उशीर होणार हे नक्की झालं. नाणेफेकीचा कौल हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.15 वाजता होणार आहे. तर सामना 7.30 वाजता सुरू होईल हे जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय संघाला मैदानात पोहोचण्यास उशीर झाल्याने हा सामना सुरू होण्यास अर्धा तास सुरू झाला आहे. या सामन्याची वेळ संध्याकाळी 7 वाजताची होती.
सामना सुरू होण्यास वेळ होणार असल्याने इंग्लंडने ही वेळ साधली. त्यांनी मैदानात आपला सराव सुरू ठेवला. इंग्लंडने मालिका आधीच 3-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना औपचारिक आहे. त्यात संघावर दडपण नसल्याने इंग्लंडचा संघ टीम इंडियावर भारी पडणार असंच दिसत आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं अव्वल स्थानही धोक्यात आलं आहे.
