AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W vs ENG W : ‘मला माझ्या संघाचा अभिमान, कारण…’; पराभवानंतरही हरमनप्रीत असं का म्हणाली

IND W vs ENG W : वूमन्स टीम इंडिया आणि वूमन्स इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये इंग्लंड संघाने 4 विकेटने विजय मिळवला. सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पाहा काय प्रतिक्रिया दिली?

IND W vs ENG W : 'मला माझ्या संघाचा अभिमान, कारण...'; पराभवानंतरही हरमनप्रीत असं का म्हणाली
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 10, 2023 | 1:03 AM
Share

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव 80 धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना इग्लंड संघाने 12 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंड संघाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामनाही उद्याच म्हणजेच रविवारी 11 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. आजच्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर देताना संघाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

पाहा काय म्हणाली हरमनप्रीत कौर?

आजच्या सामन्यात आणखी 30 ते 40 धावा केल्या असत्या तर मोठा फरक पडला असता. मला माझ्या संघाचा अभिमान आहे कारण शेवटच्या रनपर्यंत आम्ही लढलो. एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आम्हाला खेळायचं आहे. आजच्या सामन्यात दुर्दैवाने फलंदाजांना चेंडूंचा अंदाज आला नाही. इंग्लंडच्या संघाने चांगली गोलंदाजी केली, आम्हाला धावा काढताना अंकुश लावला होता. लवकर विकेट गमावल्यामुळे आम्ही 120 धावा ठेवण्याचं लक्ष्य होतं पण ते यशस्वी होऊ शकलं नसल्याचं हरमनप्रीत कौर यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या टी-20 सामन्याचा धावता आढावा

आजच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची एकदम खराब सुरूवात झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये शफाली वर्मा शून्यावर बाद झाली होती. त्यानंतर फक्त जेमिमाह रॉड्रिग्स हिने एकटीने 30 धावांची चिवट खेळी केली. त्यासोबतच स्मृती मंधाना 10 धावांवर बाद झाली होती. मात्र त्यानंतर कोणत्याच खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

दरम्यान, इंग्लंड संघाकडून अॅलिस कॅप्सी 25 धावा आणि नॅट सायव्हर-ब्रंट 16 धावा केल्या होत्या. कॅप्टन हीदर नाइट नाबाद 7 धावा आणि सोफी एक्लेस्टोन नाबाद 9 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (wk), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक

इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (C), एमी जोन्स (Wk), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल

Follow Us
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा