Rohit Sharma : “मी गेल्या 2-3..” रोहित शर्माची चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठी प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला…

Team India Captain Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. रोहित नक्की काय म्हणाला? जाणून घ्या.

Rohit Sharma : मी गेल्या 2-3.. रोहित शर्माची चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठी प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला...
Rohit sharma press conference
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 02, 2025 | 9:19 AM

टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उतरणार आहे. टीम इंडियाचा 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायलमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडिया यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी मोठ्या तयारीने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. तर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. तर 23 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. रोहितला या सामन्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहितने रोखठोक उत्तर दिली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सर्व सामने हे सुरक्षेच्या कारणामुळे दुबईत होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांच्या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. रोहितला मुंबईत 1 फेब्रुवारीला झालेल्या नमन अवॉर्ड दरम्यान या सामन्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा रोहितने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

रोहित टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यातबाबत फार गंभीर नाही. हा सामना एक सामन्य सामन्याप्रमाणेच आहे. आम्ही या सामन्यासाठी तयारी करु, असं रोहितने सांगितलं.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“बघा, मी गेल्या 2-3 वर्षांमध्ये या विषयावर फार काही बोललोय. आमच्यासाठी हा एक एक सामना आहे. आम्ही या सामन्यासाठी तशीच तयारी करु जसं इतर सामन्यांसाठी करतो. आमच्याकडून या सामन्याबाबत विशेष चर्चा होणार नाही. आम्हाला तिथे जाऊन सर्वोत्तम कामगिरी करायची आहे”, असं शब्दात रोहितने स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना म्हटलं.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.