क्रिकेटर रिंकू सिंह-खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा, पाहा व्हायरल व्हीडिओ

Rinku Singh engaged with Priya Saroj : क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज एंगेज झाले आहेत. आता या दोघांचा विवाह केव्हा होणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

क्रिकेटर रिंकू सिंह-खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा, पाहा व्हायरल व्हीडिओ
Rinku Singh engaged with Priya Saroj
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 08, 2025 | 4:19 PM

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव याचा अवघ्या काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला. कुलदीप यादव इंग्लंड दौऱ्याचा भाग आहे. कुलदीपचा त्याआधी साखरपूडा झाला. तर त्यानंतर आता टीम इंडियाच्या आणखी एकाचा साखरपूडा झाला आहे. टीम इंडियाचा स्टार फिनीशर आणि विस्फोटक फलंदाज रिंकू सिंह याचा साखरपूडा झाला आहे. रिंकूचा खासदार प्रिया सरोज यांच्यासह साखरपुडा झाला आहे. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक व्हीव्हीआयपीनी हजेरी लावली. या समारंभाला क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. दोघांच्या साखरपुड्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिंकू आणि प्रिया या दोघांच्या साखरपुड्याचं लखनौमधील फाईव्ह स्टार हॉटेल द सेंट्रम येथे आयोजन करण्यात आलं होतं. नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत रिंकू-प्रिया दोघांचा साखरपुडा पार पडला. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. रिंकूने अंगठी घालताच प्रिया भावूक झाली आणि ती रडू लागली. त्यानंतर रिंकूने प्रियाला धीर दिला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

दिग्ग्जांची उपस्थिती

या साखरपुड्याला सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव उपस्थित होते. तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि जया बच्चन या दोघांनीही हजेरी लावून समारंभाची शोभा वाढवली. तसेच क्रिकेट वर्तुळातून माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार आणि पीयूष चावला हे दोघे उपस्थित होते. तसेच यूपी क्रिकेट टीमचा कॅप्टन आर्यन जुयालही उपस्थित होता.

साखरपुड्यासाठी रिंकू आणि प्रिया या दोघांनी खास अंगठी मागवली होती. रिंकूने प्रियासाठी मुंबईहून अंगठी मागवली होती. तर प्रियाने रिंकूसाठी कोलकाताहून खास डिझाईन असलेली अंगठी मागवली. या दोन्ही अंगठ्यांची किंमत 2 लाख 50 हजार इतकी असल्याचं म्हटलं जात आहे.

रिंकू आणि प्रियाचा साखरपूडा, पाहा व्हीडिओ

दोघांबाबत थोडक्यात

प्रिया सरोज या युवा खासदारांपैकी एक आहेत. त्या उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. तर क्रिकेट चाहत्यांना रिंकू सिंह कोण आहे? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रिंकूने केकेआरकडून खेळताना आयपीएलच्या 16 व्या मोसमात शेवटच्या ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावून विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून रिंकू चर्चेत आला. रिंकूने टीम इंडियाचं 33 टी 20i तर 2 वनडेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रिंकूने टी 20i मध्ये 3 अर्धशतकांसह 549 धावा केल्या आहत. तर 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये रिंकूने 55 धावा केल्या आहेत.