AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : प्रशिक्षक राहुल द्रविडच्या अपमानाचा बदला घेण्याची रोहित सेनेला संधी, आशिया कपमधील हिशेबही होईल चुकता

World Cup 2023, IND vs BAN : टीम इंडियाला सोपा वाटणारा बांगलादेशचा पेपर ऐनवेळी घाम फोडतो. याची अनुभूती मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला आली आहे. वनडे वर्ल्डकप 2007 स्पर्धेत तर टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. आशिया कप 2023 मध्येही याबाबत पाहिलं आहे.

IND vs BAN : प्रशिक्षक राहुल द्रविडच्या अपमानाचा बदला घेण्याची रोहित सेनेला संधी, आशिया कपमधील हिशेबही होईल चुकता
टीम इंडियाला सोपा वाटणारा बांगलादेशचा पेपर ऐनवेळी घाम फोडतो. याची अनुभूती मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला आली आहे. वनडे वर्ल्डकप 2007 स्पर्धेत तर टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. आशिया कप 2023 मध्येही याबाबत पाहिलं आहे. Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 18, 2023 | 4:55 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा चौथा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास अव्वल स्थान कायम राहणार आहे. तसेच उपांत्य फेरीचं गणितही सोपं होणार आहे. पण बांगलादेशला कमी लेखून चालणार हे देखील तितकंच खरं आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेश क्रिकेटमध्ये बरेच सकारात्मक बदल दिसून आले आहेत. आयसीसी स्पर्धेतील एकही चषक नावावर नसलं तरी आपली एक वेगळी छाप सोडली आहे. तसेच वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत नुकतेच दोन मोठे उलटफेर पाहिले गेले आहेत. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. कारण प्रशिक्षक राहुल द्रविड याला याबाबतची चांगली जाणीव आहे. 2007 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार असताना त्याने याची अनुभूती घेतलेली आहे. 2007 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशकडून पराभूत झाल्याने टीम इंडियाची चांगलीच नाचक्की झाली होती.

2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला फेव्हरेट मानलं जात होतं. लीग स्टेजमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि बरमुडा हे संघ एका गटात होते. त्यामुळे बाद फेरीत टीम इंडिया सहज पोहोचेल असं गणित होतं. पण झालं भलतंच. बांगलादेशने भारताला पराभूत करताच सर्व गणित बिघडून गेली. श्रीलंकेनंही पराभवाचं पाणी पाजलं. त्यामुळे राहुल द्रविड, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह यासारख्या दिग्गज खेळाडूंना पराभव पचवावा लागला.

या पराभवला आता 16 वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हाचा कर्णधार आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी आहे. त्यामुळे रोहित सेनेला पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी आहे. यात 2007 वनडे वर्ल्डकप, आशिया कप 2023, डिसेंबर 2022 मधील द्विपक्षीय मालिका यांचा समावेश आहे. डिसेंबर 2022 मध्ये टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर गेली होती. तेव्हा मालिका 2-1 गमावली होती. मागच्या 4 वनडे सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाला 3 वेळा पराभूत केलं आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत केलं तर उपांत्य फेरीचं गणित सोपं होणार आहे. तसेच गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राहणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचं पारडं जड आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना