
टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंह हा अंडरवर्ल्डच्या रडारवर असल्याचं समजतंय. टीम इंडियाच्या या खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमकी देण्यात आल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिंकूकडे दाउदच्या गँगमधील लोकांनी 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit: PTI)

रिंकु सिंहचे सुरुवातीचे दिवस फार संघर्षाचे राहिले. मात्र गेल्या काही वर्षांत त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. क्रिकेटमुळे रिंकूचे सोन्याचे दिवस आले. रिंकु आता कोट्यधीश आहे. (Photo Credit: PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिंकूचं 2025 मधील नेटवर्थ हे 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. रिंकु क्रिकेटसह अन्य माध्यमातून कमाई करतो. मात्र त्याच्या कमाईचे 4 मुख्य स्त्रोत कोणते? जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

रिंकुला बीसीसआयकडून वार्षिक कराराअंतर्गत 1 वर्षाचे 1 कोटी रुपये मिळतात. तसेच रिंकूची आयपीएलद्वारे रग्गड कमाई होते. रिंकूला केकेआरकडून वार्षिक 13 कोटी रुपये मिळतात. (Photo Credit: PTI)

जाहीरात रिंकूच्या कमाईचा तिसरा मुख्य स्त्रोत आहे. रिंकु क्रिकेट आणि लाईफस्टाईल संबंधित अनेक ब्रँडचा अँबेसडर आहे. तसेच रियल ईस्टेट हा रिंकूच्या कमाईचा चौथा स्त्रोत आहे. (Photo Credit: PTI)