
मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आशिया कप मोहिमेची सुरुवात 2 सप्टेंबरपासून करणार आहे. टीम इंडियाचा पहिलाच सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया तयारीला लागली आहे. बीसीसीआय निवड समितीने आशिया कपसाठी सोमवारी 21 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया आता आशिया कपसाठी जोरात तयारीला लागली आहे. या दरम्यान एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेटर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. माजी क्रिकेटरने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराउंडर युवराज सिंह याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. युवराज सिंह याच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. युवराज सिंह याने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नेटकऱ्यांकडून युवराज आणि त्याच्या पत्नीचं अभिनंदन केलं जात आहे. युवराजने ट्विट केलेल्या फोटोत त्याची पत्नी हेजल कीच आणि 2 मुलं दिसत आहेत. युवराजने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
युवराज सिंह याच्या घरी चिमुकलीचं आगमन
Sleepless nights have become a lot more joyful as we welcome our little princess Aura and complete our family ❤️ @hazelkeech pic.twitter.com/wHxsJuNujY
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) August 25, 2023
या फोटोत युवराजने मुलीला हातात घेतल्याचं दिसत आहे. युवराजची लहान मुलगी दूध पितेय. तर हेजलच्या मांडीवर त्यांचं पहिलं अपत्य आहे. युवराजने ट्विटसह आपल्या मुलीचं नाव काय ठेवलंय हे देखील सांगितलं. युवराजने त्याच्या मुलीचं नाव औरा ठेवलं आहे.
दरम्यान युवराज सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल हेजल कीच दोघांनी 2016 मध्ये लग्न केलं होतं. हेजल किच आणि युवराज या दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर दोघांनी एकमेकांचा लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार केला. हेझल कीच आणि युवराज या दोघांनी 30 नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केलं. युवराज आणि हेजल हे दोघे 2022 मध्ये आई-बाबा झाले. हेजलनेने 25 जानेवारी 2022 ला मुलाला जन्म दिला. युवराजच्या मुलाचं ओरियन असं नाव आहे. तर आता युवराज आणि हेजल या दोघांनी आपल्या मुलीचं नाव औरा असं ठेवलं आहे.