WTC Final 2023 | “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनसाठी टीम इंडियाची निवड करताना घोडचूक”

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीप फायनल खेळणार आहे. मात्र त्याआधी बीसीसीआयच्या एका निर्णयावर माजी प्रशिक्षक आणि कर्णधाराने नाराजी व्यक्त केली आहे.

WTC Final 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनसाठी टीम इंडियाची निवड करताना घोडचूक
| Updated on: May 12, 2023 | 6:56 PM

मुंबई | टीम इंडियासाठी पुढील महिन्याभराचा काळ हा अग्निपरीक्षेचा आहे. कारण टीम इंडियाला जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळायची आहे. हा महामुकाबला 7 ते 11 जून रोजी लंडनमधील द ओव्हल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच केएल राहुल याला झालेल्या दुखापतीनंतर टीम इंडियाचा सुधारित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात 15 मुख्य खेळाडू आहेत. केएल राहुल याच्या जागी इशान किशन याचा समावेश केला गेला आहे. तर 3 युवा खेळाडूंना स्टँडबाय म्हणून लडंनला टीमसोबत पाठवण्यात येणार आहे.

टीम इंडियाला 2013 पासून एकदाही आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियावर वेगळं दडपण आहे. टीम इंडिया 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचली होती. मात्र तेव्हा न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता टीम इंडियाला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी आहे. टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली, तर वनडे, टी 20 आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मेटमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम ठरेल.

मात्र या सर्व गडबडीत टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कोच अनिल कुंबळे याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी जाहीर केलेल्या संघावरुन आक्षेप घेतला आहे. अनिल कुंबळेने केएल राहुल याच्या जागी इशान किशन याची निवड केल्याने त्यावर बोट ठेवलंय. निवड समितीने ऋद्धीमान साहा याला न घेऊन मोठी चूक केल्याचं कुंबळेचं मत आहे. साहा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग आहे.

कुंबळे काय म्हणाला?

“ऋद्धीमान साहा याला बघा, तो बॅटिंग आणि किपींग अशी दुहेरी भूमिका सार्थपणे पार पाडतोय. ऋद्धीमान सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. त्याच्याकडे कधीच कुणाचं लक्ष जात नाही. मात्र तो टीम इंडियाच्या सर्वोत्तम विकेटकीपरपैकी एक आहे. मला वाटतं निवड समितीने त्याला wtc final मध्ये संधी न देऊन चूक केली आहे”, असं म्हणत ताशेरे ओढले आहे. कुंबळे जिओ सिनेमावरील एका विशेष कार्यक्रमात बोलत होता.

“साहा हा टीम इंडियाच्या गोटात असायला हवा होता. सध्या केएस भरत टीममध्ये आहे. केएसला संधी मिळाल्यावर तो चांगलं करतो. मात्र साहा विकेटकीपर म्हणून भारी आहे. साहाला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने बॅटिंगने आपली छाप सोडलीय”, असंही कुंबळने नमूद केलं.

दरम्यान टीममध्ये केएल राहुल याच्या जागी विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य संघात केएस भरत आणि इशान किशन असे 2 विकेटकीपर झाले आहेत. दरम्यान या दोघांपैकी कुणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते, हे येत्या दिवसात कळेलच.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.