Hardik Pandya: मोठ्या मनाचा कॅप्टन रोहित, हार्दिकला मुंबई विमानतळावर दिली ट्रॉफी

Hardik Pandya T20 World Cup Trophy 2024: टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याने मुंबई विमानतळावर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह एन्ट्री घेतली.

Hardik Pandya: मोठ्या मनाचा कॅप्टन रोहित, हार्दिकला मुंबई विमानतळावर दिली ट्रॉफी
hardik pandya world cup trophy
| Updated on: Jul 04, 2024 | 7:01 PM

टीम इंडिया राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाचे खेळाडू काही मिनिटांपूर्वीच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळेस टीम इंडियाच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळेस टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या मनाचा मोठेपणा पाहायला मिळाला. टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर एकामागून एक येत होते. यावेळेस रोहित शर्माच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी असणार, हे सर्वांना अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी होती. कॅप्टन रोहितच्या या मनाच्या मोठेपणासाठी त्याचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक केलं जात आहे.

हार्दिकची मुंबई विमानतळावर वर्ल्ड कप ट्रॉफीसह एन्ट्री

दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर स्वागतानंतर वानखेडे स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले आहेत.  टीम इंडियाचे खेळाडू हे काहीच मिनिटांमध्ये वानखेडे येथे पोहचणार आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी विमानतळ ते मरीन ड्राईव्ह दरम्यान तोबा गर्दी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या या बसमध्ये पुढील सीटवर बसला आहे. हार्दिक टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत आहे. हार्दिकने वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचा फोटो एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘सी यू सून, वानखेडे”,  असं कॅप्शन हार्दिकने या फोटोला दिलं आहे.

हार्दिक आणि वर्ल्ड कप ट्रॉफी

टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.