AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : गौतम गंभीरने इंग्लंड दौऱ्यासाठी कॉल केलेला? चेतेश्वर पुजाराने सर्वच सांगितलं

Gautam Gambhir And Cheteshwar Pujara : टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा अनुभवी आणि संकटमोचक फलंदाज चेतेश्वर पुजारा याने मोठा खुलासा केला आहे. जाणून घ्या.

IND vs ENG : गौतम गंभीरने इंग्लंड दौऱ्यासाठी कॉल केलेला? चेतेश्वर पुजाराने सर्वच सांगितलं
Gautam Gambhir and Cheteswar PujaraImage Credit source: PTI/Getty
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 01, 2025 | 5:17 PM
Share

टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध या दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी 24 मे रोजी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याची कर्णधारपदी नियुक्ती केली. तर ऋषभ पंत याला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली. टीम इंडियाच्या इग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने साई सुदर्शन याला पहिल्यांदाच संधी दिली. तर करुण नायर याचं अनेक वर्षांनंतर भारतीय संघात कमबॅक झालं.

निवड समितीने गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजारा याला संधी दिली नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. पुजाराने या दौऱ्यासाठी काही दिवस बाकी असताना मोठा खुलासा केला आहे. पुजाराने नक्की काय म्हटलं? जाणून घेऊयात.

चेतेश्वर पुजारा याने ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. पुजाराला या मुलाखतीत तुला इंग्लंड दौऱ्यासाठी हेड कोच गौतम गंभीरचा कॉल आला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. पुजाराने काय उत्तर दिलं? जाणून घेऊयात.

पुजारा काय म्हणाला?

“नाही. मात्र मी कसोटी संघात कमबॅक करण्यासाठी तयार आहे. मला जर संधी मिळाली तर देशाचं पुन्हा प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी सन्मानाची बाब असेल. एक क्रिकेटर म्हणून तु्म्ही जोवर फिट आहात आणि योगदान देता, तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता, तोवर तुम्ही चांगल्या लयीत आहात, असं जाणवतं. मला संधी मिळाळी तर फार आनंद होईल”, असं पुजाराने स्पष्ट केलं.

पुजारा 2 वर्षांपासून बाहेर

दरम्यान चेतेश्वर पुजारा टेस्ट टीम इंडियातून 2 वर्षांपासून दूर आहे. पुजाराने टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 फायनलमध्ये खेळला होता. त्यानंतर पुजाराला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. पुजाराला देशातर्गंत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुनही संधी मिळालेली नाही. पुजारा 37 वर्षांचा आहे. तसेच संधी न मिळूनही पुजाराने निवृत्ती जाहीर केलेली नाही. पुजाराने 103 कसोटी सामन्यांमध्ये 19 शतकांच्या मदतीने 7 हजार 195 धावा केल्या आहेत.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था