WI vs IND : विंडीज विरुद्ध 448 धावांवर डाव घोषित, टीम इंडिया तिसऱ्याच दिवशी जिंकणार!

India vs West Indies 1st Test Match : टीम इंडियाने अहमदाबाद कसोटीवर घट्ट पकड मिळवली आहे. भारताने 286 धावांची आघाडी घेतल्यानंतर पहिला डाव तिसर्‍या दिवसातील खेळाआधी जाहीर केला.

WI vs IND : विंडीज विरुद्ध 448 धावांवर डाव घोषित, टीम इंडिया तिसऱ्याच दिवशी जिंकणार!
Team India Huddle Talk
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 04, 2025 | 10:55 AM

टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या दुसऱ्या आणि मायदेशातील पहिल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी सलामी देण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 162 च्या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 448 रन्स केल्या. भारताने अशाप्रकारे 286 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी डाव 5 बाद 448 धावांवर घोषित केला आणि विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या तिसऱ्याच दिवशी विजयाची शक्यता वाढली आहे.

विंडीजला भारतासमोर विजयी आव्हान ठेवण्यासाठी त्यांना आधी 286 धावांची आघाडी मोडीत काढावी लागेल. विंडीजची बॅटिंग पाहता त्यांना 200 धावा करणंही अवघड वाटतंय. विंडीजला पहिल्या डावातही 200 पार मजल मारता आली नव्हती. भारताने विंडीजचं पहिल्या डावात 44.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर पॅकअप केलं होतं. त्यामुळे टीम इंडिया हा सामना 1 डावासह तिसऱ्याच दिवशी जिंकणार, अशी चिन्हं आहेत.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियासाठी पहिल्या डावात एकूण तिघांनी शतकी खेळी केली. ओपनर केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि उपकर्णधार रवींद्र जडेजा या तिघांनी शतकं झळकावली. त्यामुळे भारताला 400 पार मजल मारता आली.

यशस्वी जैस्वाल याने 36 आणि साईने 7 धावा केल्या. कॅप्टन शुबमन गिल याने 50 धावा केल्या. तसेच ओपनर केएल राहुल याने ध्रुवसह एक बाजू लावून धरत मायदेशात जवळपास 9 वर्षांनंतर शतक ठोकलं. मात्र शतकानंतर केएल आऊट झाला. केएलनंतर भारताने एकमेव विकेट गमावली. भारतासाठी युवा विकेटकीपर ध्रुव जुरेल याने सर्वाधिक धावा केल्या. जुरेलने 210 बॉलमध्ये 125 रन्स केल्या. जुरेलने या खेळीत 3 षटकार आणि 15 चौकार लगावले. ध्रुवचं हे कसोटी कारकीर्दीतील पहिलवहिलं शतक ठरलं.

जुरेलनंतर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने सहाव्या विकेटसाठी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नॉट आऊट 24 रन्सची पार्टनरशीप केली.जडेजा 104 आणि सुंदर 9 रन्सवर नॉट आऊट परतले. विंडीजसाठी कॅप्टन रोस्टन चेज याने 2 विकेट्स मिळवल्या. तर जेडन सील्स, खारी पियारे आणि वॉरिकॅन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

भारताकडून पहिला डाव घोषित, तिसऱ्याच दिवशी विजय फिक्स!

दरम्यान त्याआधी विंडीजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र विंडीजत्या एकालाही अर्धशतकापर्यंत पोहचता आलं नाही. भारतीय गोलंदाजांना ठराविक अंतराने झटके देत 44.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर गुंडाळलं. टीम इंडियासाठी मोहम्मद सिराज याने 4 विकेट्स मिळवल्या. जसप्रीत बुमराह याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव याने 2 विकेट्स मिळवल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने 1 विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली.