टीम इंडियाचा जखमी वाघ अखेर परतला, रिषभ पंत यंदाच्या IPL मध्ये खेळणार, पण असणार ही अट

Rishabh Pant In IPL 2024 : टीम इंडियाचा जखमी वाघ अखेर परतला आहे. जीवावर बेतण्यासारखा अपघात झाल्यावरही त्याने हार मानली नाही. मेहनत घेतली आणि आता आयपीएलमध्ये परत एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती समजत आहे.

टीम इंडियाचा जखमी वाघ अखेर परतला, रिषभ पंत यंदाच्या IPL मध्ये खेळणार, पण असणार ही अट
Rishabh Pant Back in IPl
| Updated on: Dec 12, 2023 | 5:49 PM

मुंबई : गेल्या वर्षभरापासून अपघातामुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या टीम इंडियाच्या स्टार खेळाडू ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यंदाच्या सीझनमध्ये ऋषभ पंत आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळणार असल्याची माहिती समजत आहे. इतकंच नाहीतर पंत यंदाच्या मोसमामध्ये दिल्लीच्या कर्णधारपदाचीही जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र त्यासाठी त्याला एक अट घालण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र क्रिकेट चाहते पंतच्या येण्याने आनंदी झाले आहेत.

पंतसाठी असणार एक अट

ऋषभ पंंत 2023 साली झालेल्या गंभीर अपघातामुळे मागील सीझनमध्ये खेळू नव्हता शकला. यंदाच्या सीझनमध्ये पंत कमबॅक करत असल्याने फ्रँचयझीसुद्धा खूष असतील. नोव्हेंबरमध्ये पंतने आपल्या कमबॅकचे संकेत दिले होते. दिल्ली कॅपिटल्सच्या कोलकातामध्ये झालेल्या शिबिराध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी सौरव गांगुली, मुख्य कोच रिकी पाँन्टिंग आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे उपस्थित होते.  आयपीएल लिलावआधी दिल्लीची खेळाडू रिटेन आणि रीलिज करण्याची बैठक झाली होती. त्यामध्ये पंत सहभागी झाल्याची माहिती समजत आहे.

ऋषभ पंत यंदा आयपीएलमध्ये खेळणार असला तरीसुद्धा त्याला एक अट आहे. ती अट म्हणजे पंतला सामन्यात कीपिंग करता येणार नाही. पंत आता मैदानात कॅप्टन म्हणून असणार आणि फलंदाजी करताना दिसला जाईल. याबाबत पंतने अधिकृत अशी कोणतीही माहिती दिली नाही. ऋषभ पंतने आयपीएमध्ये  98 सामने खेळले असून यामध्ये 2838 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, ऋषभ पंतचा 31 डिसेंबर  2022 च्या मध्यरात्री अपघात झाला. नशीब बलवत्तर म्हणून पंत त्या अपघातातून वाचला होता. एक वर्षभरात पंत क्रिकेटपासून दूर राहिला पण त्याने हार मानली नाही. गड्याने मेहनत घेतली आणि जबरदस्त कमबॅक केल्याचं पाहायला मिळत आहे.