AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-हार्दिक खेळणार की नाही? अखेर सस्पेन्स संपला

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पण रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या खेळणार का? असा प्रश्न आहे. त्याबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-हार्दिक खेळणार की नाही? अखेर सस्पेन्स संपला
IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-हार्दिक खेळणार की नाही? अखेर सस्पेन्स संपलाImage Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2026 | 3:49 PM
Share

India vs Afghanistan ODI: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13 जूनपासून तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेपासून वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची खऱ्या अर्थाने तयारी सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी एक वर्षांचा अवधी शिल्लक आहे. त्यासाठी टीम बांधणी केली जात आहे. असं असताना अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या फिट अँड फाईन आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोघेही आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकतील असं वाटलं होतं. पण दोघांनी फिटनेस टेस्ट पास केली असून मालिकेत खेळण्याबाबतचा संभ्रम दूर केला आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसच्या सायन्स अँड स्पोर्ट टीमने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा खेळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

हार्दिक पांड्याचं भारतीय वनडे संघात 14 महिन्यानंतर पुनरागमन होणार आहे. तर रोहित शर्मा जानेवारीनंतर पुन्हा एकदा वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. हार्दिक पांड्या 2 जूनपासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये होता. पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. सूत्रांनी सांगितलं की, 2 जूनपासून हार्दिक पांड्याने सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये सामन्यातील प्रत्येक गोष्ट केली. त्याने 10 षटकं टाकली आणि सर्वकाही ठीक असल्याचं दिसून आलं. हार्दिक पांड्याला कोणताही त्रास झाला नाही. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासाठी ही वनडे मालिका खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोघंही फिट झाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान वनडे मालिका

शुबमन गिलच्या नेतृ्त्वात भारतीय संघाची तयारी सुरू झाली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध पहिला वनडे सामना 13 जून रोजी धर्मशाळेत होणार आहे. त्यानंतर दुसरा वनडे सामना 17 जून रोजी लखनौमध्ये होईल. तर तिसरा वनडे सामना 20 जून रोजी चेन्नईत खेळला जाईल. या तीन सामन्यात रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला आपली क्षमता सिद्ध करून दाखवावी लागेल. कारण या मालिकेतील चांगल्या कामगिरीवरच पुढचं गणित अवलंबून असणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...