Team India: टीम इंडियासाठी वाटेल ते! रोहितसेनेला पाहण्यासाठी पठ्ठ्याची झाडावरच ‘फिल्डिंग’

Fan On Tree: टीम इंडियाचा चाहता विजयी मिरवणुकीदरम्यान रोहितसेनेला पाहण्यासाठी झाडावर लपून बसला होता. झाडाजवळ टीम इंडियाची बस येताच त्याने फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. या चाहत्यांना अशा स्थितीत पाहून टीम इंडियाच्या खेळाडूना धक्काही बसला आणि हसूही आलं.

Team India: टीम इंडियासाठी वाटेल ते! रोहितसेनेला पाहण्यासाठी पठ्ठ्याची झाडावरच फिल्डिंग
FAN ON TREE
| Updated on: Jul 04, 2024 | 8:37 PM

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर नरीमन पॉइंट येथून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढली जात आहे. ओपन डेक बसमधून ही मिरवणूक काढली जात आहे. आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना जोरदार कसरत करावी लागली आहे. मरीन ड्राईव्हमध्ये एकच गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. काही जणांना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना जवळून पाहण्याची संधी मिळाली. तर काहींना दूरुनच समाधान मानावं लागलं. मात्र एक क्रिकेट चाहत्याने तर हद्दच केली आहे. टीम इंडियाला जवळून पाहण्यासाठी या चाहत्याने जे काही केलंय, ते अद्याप कुणीही केलं नसावं. याला धाडस म्हणावं की मुर्खपणा हा नंतरचा मुद्दा, पण त्याने जे काही केलंय, त्यामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाची विजयी मिरवणूक नरीमन पॉइंट येथून वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघाली. या दरम्यान एक चाहता चक्क झाडाच्या फांदीवरच झोपलेल्या स्थितीत दिसून आला. यावरुन क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी काय लेव्हलची क्रेझ असेल, यावरुन अंदाज येतो.

क्रिकेट चाहत्याचा ‘मॅड’नेस

टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.