IND vs SA : U 19 वूमन्स टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा

SA vs IND U 19 World Cup 2025 Final Match Result : टीम इंडियाने शफाली वर्मा हीच्या नेतृत्वात 2023 साली पहिलाच अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा टीम इंडियाने वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे.

IND vs SA : U 19 वूमन्स टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा
u 19 womens team india t20i world cup 2025 final
Image Credit source: bcci women x account
| Updated on: Feb 02, 2025 | 2:44 PM

वूमन्स टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात 9 विकेट्सने धुव्वा उडवत एकूण आणि सलग दुसरा अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने या वर्ल्ड कप विजयासह नववर्षातील अप्रतिम सुरुवात केलीय. सलग दुसऱ्या वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या अंडर 19 वूमन्स टीमचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. टीम इंडियाने याआधी 2023 साली शफाली वर्मा हीच्या नेतृत्वात पहिलावहिला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता.

टीम इंडियाची बॅटिंग

उपकर्णधार मुंबईकर सानिका चाळके हीने विजयी चौकार मारत टीम इंडियाला विजयी केलं. सानिका आणि गोंगाडी त्रिशा या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 48 धावांची विजयी भागीदारी केली. गोंगाडी त्रिशा हीने 13 चेंडूंमध्ये सर्वाधिक 44 धावांची नाबाद खेळी केली. त्रिशाच्या या खेळीत 8 चौकारांचा समावेश होता. तर सानिकाने 4 चौकारांसह नाबाद 26 धावांची विजयी खेळी साकराली. तर त्याआधी जी कामालिनी हीने 8 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेके हीने जी कामालिनी हीला आऊट करत एकमेव विकेट घेतली.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेच्या मोजून फक्त चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. चौघींना तर भोपळाही फोडता आला नाही. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 82 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाकडून गोंगाडी त्रिशा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पारुनिका सिसोदीया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर शबनम शकील हीने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, डायरा रामलाकन, फे काउलिंग, काराबो मेसो (विकेटकीपर), मिके व्हॅन वुर्स्ट, सेशनी नायडू, ॲश्लेग व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी आणि नथाबिसेंग निनी.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगडी त्रिशा, ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्ही जे, शबनम एम डी शकील, पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा.