
भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम सुरुवात केली आहे. केएल आणि यशस्वी या दोघांनी शानदार बॅटिंग करत इंग्लंडला विकेटसाठी संघर्ष करायला लावला. यशस्वी आणि केएल जोडीने हेडिंग्ले लीड्समध्ये पहिल्या विकेटसाठी 149 बॉलमध्ये 91 रन्सची पार्टनरशीप केली. या दोघांनी 91 पैकी 64 धावा या चौकारांच्या मदतीने केल्या. दोघांनीही प्रत्येकी 8-8 चौकार लगावले. मात्र लंचआधी इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडने लंचआधीच्या शेवटच्या 5 बॉलमध्ये टीम इंडियाला 2 झटके दिले. इंग्लंडने अशाप्रकारे भारतीय संघाला पहिल सत्रं नावावर करण्यापासून रोखलं.
टीम इंडियाने लीड्समध्ये लंचपर्यंत 25.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 92 रन्स केल्या. टीम इंडियाच्या सलामी जोडीने लीड्समध्ये या 91 धावांच्या भागीदारीसह इतिहास घडवला. टीम इंडियाची 2011 नंतर सेना देशात 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याची ही पाचवी वेळ ठरली. विशेष म्हणजे या पाचही भागीदारींमध्ये योगदान दिलं आहे. तर यशस्वी आणि केएलची अशी कामगिरी करण्याची ही चौथी वेळ ठरली.
केएल आणि यशस्वी या जोडीने या सलामी भागीदारीसह दिग्ग्ज सुनील गावसकर आणि के श्रीकांत या दिग्गज माजी जोडीचा रेकॉर्ड ब्रेक केला. या दोघांनी 1986 साली लीड्समध्ये सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी भागीदारी केली होती. या जोडीने 64 धावांची भागीदारी केली होती.भारताने तेव्हा हा सामना जिंकला होता.
दरम्यान भारतीय संघाच्या सलामी जोडीची सेना देशात 2011 नंतर 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याची ही पाचवी वेळ ठरली. टीम इंडियाच्या सलामी जोडीने इंग्लंडमध्ये 3 वेळा तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी 1-1 वेळा हा कारनामा केला आहे.
सलामी जोडीचा ‘पंच’
ONLY 5 TIMES INDIAN OPENING PAIR MADE 90+ RUNS IN SENA :
– kl Rahul & Rohit Sharma 2021
– kl Rahul & Rohit Sharma 2021
– kl Rahul & Mayank Agarwal 2021
– kl Rahul & Yashasvi Jaiswal 2024
– Kl Rahul & Jaiswal 2025*— MANU. (@IMManu_18) June 20, 2025
केएल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने 2021 साली नॉटिंगघममध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर त्याच वर्षात याच जोडीने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये असंच केलं होतं. दक्षिण आफ्रिकेत 2021 मध्ये केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या जोडीने 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली होती. तर गेल्या वर्षी अर्थात 2024 साली केएल राहुल आणि यशस्वीने 90 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती.