Asia cup: फक्त, 37 रन्सवर ऑल आऊट….पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीमची भारताने केली वाईट हालत

Asia cup: टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर त्यांचं काहीच चाललं नाही. सपशेल शरणागती पत्करली

Asia cup: फक्त, 37 रन्सवर ऑल आऊट....पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीमची भारताने केली वाईट हालत
team india
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 10, 2022 | 3:07 PM

मुंबई: महिलांच्या आशिया कपमध्ये (Asia cup) टीम इंडियाने (Team India) जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने थायलंडला अक्षरक्ष: गुडघे टेकायला लावले. थायलंडची (Thailand Team) संपूर्ण टीम फक्त 37 रन्समध्ये ऑलआऊट झाली. याच थायलंडच्या टीमने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला धूळ चारली होती.

आज भारतासमोर त्यांच काही चाललं नाही. त्या रोमांचक सामन्यात शेवटच्या ओव्हरपर्यंत फाइट करुन त्यांनी पाकिस्तानला हरवलं होतं.

किती ओव्हरमध्ये टीम इंडिया जिंकली?

आज टीम इंडिया विरुद्ध खेळताना थायलंडची टीम पूर्णपणे निष्प्रभ ठरली. त्यांचं काहीच चाललं नाही. फक्त 37 रन्सवर टीम ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. महिला टीमने 9 विकेट आणि 84 चेंडू राखून सामना जिंकला.

फक्त एका फलंदाजाच्या दोन आकडी धावा
थायलंडची टीम प्रथम फलंदाजी करत होती. टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीसमोर खेळण त्यांना जमत नव्हतं. फक्त 15.1 ओव्हर्समध्ये थायलंडची संपूर्ण टीम ऑल आऊट झाली.

थायलंडचे चार फलंदाज खातही उघडू शकले नाहीत. फक्त एका फलंदाजाने दोन आकडी धावासंख्या गाठली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा स्कोर 12 धावा होता. थायलंडच्या फलंदाजांनी खराब प्रदर्शन केलं. पण त्याचवेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर बॉलिंग केली.