Ashes Series: अ‍ॅशेसचा थरार, बेन स्टोक्सने टी-शर्टमध्ये लपवलेला चेहरा, भारतानेही ऑस्ट्रेलियाला असचं रडवलेलं

| Updated on: Jan 09, 2022 | 7:19 PM

सिडनी: सलग दुसऱ्यावर्षी सिडनीमध्ये रोमांचक कसोटी सामन्याचा थरार पाहायला मिळाला. मागच्यावर्षी भारताने कसोटी ड्रॉ करुन ऑस्ट्रेलियाचा मार्ग रोखला होता. यंदा इंग्लंडने नव्या वर्षात ऑस्ट्रेलियाला विजयाचे सुख मिळू दिले नाही. अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पाचव्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचे नऊ विकेट गेले होते. तरीही इंग्लंडने कशीबशी ही कसोटी अनिर्णीत राखली व मालिकेत व्हाइटवॉश टाळला. (The Ashes Nervous […]

Ashes Series: अ‍ॅशेसचा थरार, बेन स्टोक्सने टी-शर्टमध्ये लपवलेला चेहरा, भारतानेही ऑस्ट्रेलियाला असचं रडवलेलं
(Photo Courtesy: @7Cfricket Screengrab)
Follow us on

सिडनी: सलग दुसऱ्यावर्षी सिडनीमध्ये रोमांचक कसोटी सामन्याचा थरार पाहायला मिळाला. मागच्यावर्षी भारताने कसोटी ड्रॉ करुन ऑस्ट्रेलियाचा मार्ग रोखला होता. यंदा इंग्लंडने नव्या वर्षात ऑस्ट्रेलियाला विजयाचे सुख मिळू दिले नाही. अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पाचव्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचे नऊ विकेट गेले होते. तरीही इंग्लंडने कशीबशी ही कसोटी अनिर्णीत राखली व मालिकेत व्हाइटवॉश टाळला. (The Ashes Nervous Ben Stokes unable to watch as England avoid whitewash) 

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडची जोडी
कसोटी सामना निर्णायक टप्प्यावर असताना स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला जॅक लीचचा महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिला. नऊ विकेट गेल्यानंतर सिडनी कसोटीच्या पाचव्यादिवशी शेवटचे 12 चेंडू बाकी होते. क्रीझवर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही इंग्लंडची शेवटची जोडी मैदानात होती. आपल्या गोलंदाजीने भल्या-भल्या हैराण करुन सोडणाऱ्या या दोघांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या.

स्मिथचे सहा चेंडू खेळून काढले
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त एकाविकेटची आवश्यकता होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिका 4-0 ने जिंकणार होती. स्टीव्ह स्मिथने शेवटच्या तीन षटकांपैकी दोन षटक टाकली. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला फक्त एक विकेट हवी होता. जेम्स अँडरसन क्रीझवर होता. त्याने कसेबसे लेग स्पिनर स्मिथचे सहा चेंडू खेळून काढले व कसोटी अनिर्णीत राखली.

कमिन्सने खूपच आक्रमक फिल्ड सेट केली
या शेवटच्या षटकात प्रचंड तणाव होता. सिडनीच्या मैदानातील प्रक्षेक स्मिथला साथ देत होते. ऑस्ट्रेलियन कॅप्टन कमिन्सने खूपच आक्रमक फिल्ड सेट केली होती. स्मिथने अँडरसनची विकेट काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मैदानात त्यावेळी इतकी रोमांचक स्थिती होती की, बेन स्टोक्सध्ये सामना पाहण्याची सुद्धा हिम्मत नव्हती. त्याने आपला चेहरा टी-शर्ट मध्ये लपवला होता. अँडरसनने स्मिथचा शेवटचा चेंडू खेळून काढला आणि इंग्लंडच्या संघाने सुटकेचा निश्वास टाकला. अन्यथा 4-0 असा व्हाइटवॉश घेऊन त्यांना मायदेशी परतावे लागले असते.

संबंधित बातम्या:

Rohit Sharma| रोहित शर्माची भावनिक बाजू, पोस्ट केला इमोशनल VIDEO
Sachin Tendulkar: ‘सचिनला प्रश्न विचारणारे आपण कोण?’ मायकल वॉनची थेट ‘क्रिकेटच्या देवाला’ नडण्याची भाषा
Shardul Thakur: ‘झुकती है दुनिया झुकानेवाला…’, आपल्या लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर झुकला हा दिग्गज क्रिकेटपटू

(The Ashes Nervous Ben Stokes unable to watch as England avoid whitewash)