Sachin Tendulkar: ‘सचिनला प्रश्न विचारणारे आपण कोण?’ मायकल वॉनची थेट ‘क्रिकेटच्या देवाला’ नडण्याची भाषा

अ‍ॅशेस सीरीजच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बेन स्टोक्स नशीबाने आऊट होता-होता बचावला. त्यावरुन सोशल मीडियावर एक वादळ निर्माण झालं असून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही (sachin Tendulkar) त्या चर्चेत सहभागी झाला आहे.

Sachin Tendulkar: 'सचिनला प्रश्न विचारणारे आपण कोण?' मायकल वॉनची थेट 'क्रिकेटच्या देवाला' नडण्याची भाषा

मुंबई: अ‍ॅशेस सीरीजच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बेन स्टोक्स नशीबाने आऊट होता-होता बचावला. त्यावरुन सोशल मीडियावर एक वादळ निर्माण झालं असून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही (sachin Tendulkar) त्या चर्चेत सहभागी झाला आहे. त्याने गोलंदाजांना सपोर्ट करताना एक कायदा हवा, असं मत मांडलं आहे. यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने सचिन तेंडुलकरला उपरोधिक टोला लगावला आहे. (Michael Vaughan takes dig at sachin Tendulkar for hitting the stumps law tweet)

सिडनी कसोटीत नेमकं काय घडलं?
डावाच्या 30 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. चेंडू पॅडला लागल्याचा विचार करून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे अपील ऐकून अंपायर पॉल रायफल यांनीही बोट वर केले. या निर्णयाविरोधात बेन स्टोक्सने लगेचच डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये जे दिसले ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. चेंडू बॅट किंवा पॅडला लागला नव्हता. खरे तर चेंडू स्टंम्पला लागला होता. मात्र बेल्स खाली पडल्या नाहीत, त्यामुळे स्टोक्स थोडक्यात बचावला.

तेंडुलकर काय म्हणाला?
ही विचित्र घटना पाहून दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर गोलंदाजांच्या समर्थनात मैदानात उतरला आहे. या घटनेबद्दल सचिन तेंडुलकर म्हणाला, ‘बॉल स्टम्पला लागल्यानंतरही बेल्स पडल्या नाहीत, यासाठी ‘हिटिंग द स्टंप्स’ हा नियम करायला हवा. तुम्हाला काय वाटते? गोलंदाजांच्या प्रति आपण निष्पक्ष असले पाहिजे.

आता मायकल वॉनचं म्हणणं काय आहे?
सचिन स्वत: आता खेळत असता, तर त्याने सध्या अस्तित्वात असलेल्या विदयमान कायद्याचं समर्थन केलं असतं, असं मायकल वॉनचं म्हणणं आहे. “सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारणारे आपण कोण? पण मी खात्रीने सांगतो की, सचिन आता स्वत: खेळत असता तर बेल्स पडल्या पाहिजेत अशी त्याची भूमिका असती” एकप्रकारे मायकल वॉनने सचिनच्या सच्चेपणावरच प्रश्न निर्माण केला आहे.

“यावर चर्चा झाली पाहिजे. मी सचिनला टि्वटरवर सांगितलय की, मी हा विषय MCC मध्ये घेऊन जाईन. बेल्स पडल्या पाहिजेत, हे माझं स्वत:च मत आहे” असं शेन वॉर्नने सांगितलं.

संबंधित बातम्या:

IPL 2022: यंदाही आयपीएल परदेशात होणार? BCCI च्या मनात नेमकं काय चाललय?
NZ vs BAN: काय फिल्डिंग केली, बांगलादेशने न्यूझीलंडला 1 चेंडूत दिल्या 7 धावा, पाहा VIDEO
रोहित शर्माची भावनिक बाजू, पोस्ट केला इमोशनल VIDEO

 

(Michael Vaughan takes dig at sachin Tendulkar for hitting the stumps law tweet)

Published On - 4:25 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI