AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: यंदाही आयपीएल परदेशात होणार? BCCI च्या मनात नेमकं काय चाललय?

यंदाच्या आयपीएल मोसमाच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. एप्रिलच्या सुरुवातीला आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मेगा ऑक्शन फ्रेबुवारीमध्ये होईल.

IPL 2022: यंदाही आयपीएल परदेशात होणार? BCCI च्या मनात नेमकं काय चाललय?
आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) 8 च्या जागी 10 संघ आमने-सामने भिडताना दिसतील. यात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ नव्याने सामिल झाले आहेत. दरम्यान आता या संघानी लिलावप्रक्रियेपूर्वी इतर संघाची जुळवाजुळव सुरु केली असून लखनऊ संघाने मुख्य प्रशिक्षक पदासाठीही दोन दिग्गज माजी खेळाडूंशी बोलणी केली आहे.
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 9:09 PM
Share

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दरवर्षी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केली जाते. मागची दोन वर्ष IPL स्पर्धेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. यंदाच्यावर्षी ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा BCCI चा पूर्ण प्रयत्न आहे. पण काही कारणांमुळे हे शक्य झालं नाही, तर परदेशात स्पर्धा आयोजित करण्याच्या पर्यायावरही विचार सुरु आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी स्पोटर्स तकला ही माहिती दिली आहे. स्पर्धेआधी लिलाव आयोजित करण्याकडे सर्व लक्ष असून बोर्डाचे मेगा ऑक्शनला पहिले प्राधान्य आहे.

कोरोना स्थितीवर बोर्डाचे लक्ष सध्याच्या देशातील कोविड-19 स्थितीवर बोर्ड बारीक लक्ष ठेवून आहे. स्पर्धेच्या स्थानाबद्दल अजून तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. रविवारी देशात 1,59,632 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. शनिवारपेक्षा हे आकडा 12.4 टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमण होऊ शकणाऱ्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या 3,623 आहे.

रुग्णसंख्या वाढली तर…. यंदाच्या आयपीएल मोसमाच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. एप्रिलच्या सुरुवातीला आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मेगा ऑक्शन फ्रेबुवारीमध्ये होईल. स्पर्धेच्यावेळी रुग्णसंख्या वाढली तर काय? या प्रश्नावर सूत्राने सांगितले की, “आमची टीम या प्रश्नावर काम करत आहे. राज्य सरकारांकडून काय मार्गदर्शकतत्व जारी केली जातात, त्यावर आमचं लक्ष आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातील”

सध्या ऑक्शनवर आमचं लक्ष “आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहोत. यामध्ये परदेशात आयपीएल आयोजित करण्याचाही पर्याय आहे. पण भारतातच स्पर्धा आयोजित करण्याला आमचे पहिले प्राधान्य आहे. सध्या ऑक्शनवर आमचं लक्ष आहे. त्या संदर्भात आम्ही लवकरच निर्णय घेऊ” असे सूत्राने सांगितले.

2020 ची आयपीएल स्पर्धा UAE मध्ये खेळवण्यात आली होती. 2021 ची आयपीएल स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीचे काही सामने सुद्धा झाले. पण नंतर कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर स्पर्धा पुढे ढकलण्यात आली व UAE मध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बीसीसीआयने सध्या देशांतर्गत स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये महत्त्वाच्या रणजी करंडक स्पर्धेचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या:

IND vs WI वनडे-टी20 मालिकेवर कोरोनाचं सावट, संसर्ग टाळण्यासाठी BCCI चं मोठं पाऊल! ‘खेळ कोणीही सुरु करुद्या, संपवण्याचं काम माझं’, टीम इंडियातील भूमिकेबाबत वेंकटेश अय्यरचं वक्त्तव्य आला रिटायर झाला असं नाही, आता क्रिकेटमध्येही नोटीस पिरियड, नवा नियम कुणाचा, वाचा सविस्तर

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.