आला रिटायर झाला असं नाही, आता क्रिकेटमध्येही नोटीस पिरियड, नवा नियम कुणाचा, वाचा सविस्तर

शविनारी श्रीलंका बोर्डाने कार्यकारी समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले, त्यामध्ये कोणत्याही खेळाडुला निवृत्ती घ्यायची असल्यास तीन महिने आधी नोटीस देणे बंधनकारक असणार आहे.

आला रिटायर झाला असं नाही, आता क्रिकेटमध्येही नोटीस पिरियड, नवा नियम कुणाचा, वाचा सविस्तर

मुंबई : तुम्हाला एखाद्या कंपनीतून रिटायर होताना, किंवा जॉब सोडताना नोटीस पिरियड द्यावा लागतो, अनेकांना हा नोटीस पिरियड करण्याची पद्धत फार कंटाळवाणी वाटते, त्यामुळे काही कंपन्या बेसीक सॅलरीची अमाऊंट पे करून नोटीस पिरियड बाय करण्याचाही परवानगी देतात. आता पर्यंत क्रिकेटमध्ये असे काही ऐकले नव्हते, मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा हा नियम सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय, कारण पहिल्यासारखी खेळाडुांना ट्विटरवरून किंवा इतर माध्यमातून निवृत्ती जाहीर करता येणार नाही.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची नवी नियमावली

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या दोन खळाडुंनी तीन दिवसात निवृत्ती जाहीर केल्याने मोठा झटका बसला आहे, फलंदाज भानुका राजपक्षा आणि दानुष्का गुणतिलका ने अलिकडेच अचानक निवृत्ती घेतली आहे. या अचानक झालेल्या निवृत्तीने अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसातच टीमधील महत्वपूर्ण खेळाडू बाहेर गेले आहेत, त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डही संकटात सापडला आहे. या अचानक निवृत्तींच्या घोषणानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्ड कॉर्पोरेट नियमांकडे वळले आहे. कोणत्याही खेळाडून निवृत्ती घेण्यापूर्वी काही महिने आगोदर बोर्डाला नोटीस देणे गरजेचे आहे, असा नवा नियम काढला आहे. त्याचबरोबर निवृत्ती घेणाऱ्या खाळाडुंसाठी नवी नियमावलीही लागू करण्यात आली आहे.

शविनारी बोर्डाने कार्यकारी समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले, त्यामध्ये कोणत्याही खेळाडुला निवृत्ती घ्यायची असल्यास तीन महिने आधी नोटीस देणे बंधनकारक असणार आहे. एवढेच नाही तर खेळाडु निवृत्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्याला विदेशी क्रिकेट लीग खेण्यासाठी परवानगी प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच निवृत्त झालेल्या खेळाडुला श्रीलंकेत खेळण्यासाठीही काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

‘ठाकरे सरकारचा मोठा कोविड घोटाळा’, सोमय्यांचा पुन्हा आरोप, शिवसेनेचंही जोरदार प्रत्युत्तर

Kalyan Corona : केडीएमसीचे कृषि उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश

Pushpa The Rise | ’83’ला ओव्हरटेक करत पुष्पाच्या हिंदी वर्जनचा धुमाकूळ, तब्बल 73 कोटीची कमाई

 

Published On - 10:50 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI