AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs BAN: काय फिल्डिंग केली, बांगलादेशने न्यूझीलंडला 1 चेंडूत दिल्या 7 धावा, पाहा VIDEO

लंच नंतरच्या पहिल्या षटकात हा प्रकार घडला. समोर न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग फलंदाजी करत होता. इबादत हुसैनने टाकलेल्या षटकातील शेवटच्या चेंडूने यंगच्या बॅटची कड घेतली

NZ vs BAN: काय फिल्डिंग केली, बांगलादेशने न्यूझीलंडला 1 चेंडूत दिल्या 7 धावा, पाहा VIDEO
Tnz vs ban twitter photo
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 2:52 PM
Share

ख्राईस्टचर्च: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये (NZ vs BAN) ख्राईस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिली कसोटी जिंकून बांगलादेशने इतिहास रचला आहे. पण दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली आहे. आज बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानावर अक्षरक्ष: हास्यास्पद चूक केली. ज्यामुळे न्यूझीलंडला एका चेंडूत सात धावा मिळाल्या. (Bangladesh as New Zealand’s Will Young scores 7 runs in 1 ball during 2nd Test)

मैदानात काय घडलं? लंच नंतरच्या पहिल्या षटकात हा प्रकार घडला. समोर न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग फलंदाजी करत होता. इबादत हुसैनने टाकलेल्या षटकातील शेवटच्या चेंडूने यंगच्या बॅटची कड घेतली व चेंडू पहिल्या स्लीपमध्ये गेला. दुसऱ्या स्लीपमधल्या खेळाडूने तो झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला झेल पकडता आला नाही. चेंडू फाईन लेगला गेला. यंग आणि टॉम लॅथम दोन्ही फलंदाजीना पळून सहज तीन धावा काढल्या.

त्यानंतर काय झालं? फाईन लेगवरुन फिल्डरने विकेटकिपर नुरुल हसनकडे थ्रो केला. हसनने चेंडू पकडून बॉलर इबादतच्या दिशेने थ्रो केला. पण तो ओव्हर थ्रो ठरला. इबादत चेंडूच्या मागे पळाला पण चेंडूने सीमारेषा पार केली. अशा प्रकारे एकाच चेंडूवर बांगलादेशने न्यूझीलंडला सात धावा दिल्या. या चुकीमुळे बांगलादेशची टीम सोशल मीडियावर ट्रोल होतेय. दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर न्यूझीलंडने वर्चस्व गाजवलं. त्यांनी एक बाद 349 धावा केल्या आहेत. लॅथम (186) धावांवर नाबाद आहे तर डेव्हॉन कॉनवे (99) धावांवर खेळतोय.

संबंधित बातम्या: IND vs WI वनडे-टी20 मालिकेवर कोरोनाचं सावट, संसर्ग टाळण्यासाठी BCCI चं मोठं पाऊल! ‘खेळ कोणीही सुरु करुद्या, संपवण्याचं काम माझं’, टीम इंडियातील भूमिकेबाबत वेंकटेश अय्यरचं वक्त्तव्य आला रिटायर झाला असं नाही, आता क्रिकेटमध्येही नोटीस पिरियड, नवा नियम कुणाचा, वाचा सविस्तर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.