Rohit Sharma| रोहित शर्माची भावनिक बाजू, पोस्ट केला इमोशनल VIDEO

रोहित शर्मा (Rohit Sharma) आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला असला, तरी त्याला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची पहिली संधी मुंबई इंडिन्यसने दिली.

Rohit Sharma| रोहित शर्माची भावनिक बाजू, पोस्ट केला इमोशनल VIDEO
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 3:35 PM

मुंबई: रोहित शर्मा (Rohit Sharma) आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला असला, तरी त्याला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची पहिली संधी मुंबई इंडिन्यसने दिली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहितचं मुंबई इंडियन्स सोबत एक वेगळं भावनिक नात तयार झालं आहे. काल रोहितने सोशल मीडियावर एक इमोशनल व्हिडीओ शेअर करुन मुंबई इंडियन्ससोबतच्या 11 वर्षाच्या नात्याचं सेलिब्रेशन केलं. रोहितच्या या व्हिडीओनंतर फ्रेंचायजीनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन रोहित सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. (Rohit Sharma posts emotional video of 11 years journey with Mumbai Indians)

20 लाख डॉलर्स मोजून विकत घेतलं होतं

रोहितचा आयपीएलमधील प्रवास डेक्कन चार्जससोबत सुरु झाला होता. मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी डेक्कन चार्जसकडून खेळताना त्यांनी 2009 च्या मोसमाचे जेतेपदही पटकावले होते. रोहित 2011 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. त्याला त्यावेळी मुंबईने 20 लाख डॉलर्स मोजून विकत घेतलं होतं. रोहितने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये मुंबई टीम सोबतच्या काही आठवणी शेअर केल्या होत्या.

मध्यावर रिकी पाँटिंगने कर्णधारपद सोडलं

दुसऱ्याबाजूला मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली. यामध्ये रोहितच्या हातात IPL ची ट्रॉफी आहे व 8 जानेवारी 2011 च्या ऑक्शनचं टि्वट आहे. रोहितकडे कॅप्टनशिपची जबाबदारी अचानक आली होती. 2013 च्या सीजनमध्ये मध्यावर रिकी पाँटिंगने कर्णधारपद सोडले. त्यावर्षी मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वाखाली एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर मात करुन आयपीएलचे जेतेपद मिळवले. त्याच सीजनमध्ये चॅम्पियन्स लीग 20 जे जेतेपदही मिळवले.

“2013 च्या सीजनमध्ये पाँटिंगला धावा करणे जमत नव्हते. त्यामुळे तो कर्णधारपदावरुन पायउतार झाला. पाँटिंगने माझ्याकडे कर्णधारपद दिले. त्या सीजनमध्ये खेळाडू आणि कोच दोन्ही भूमिका पाँटिंग निभावत होता” 2020 मध्ये आर.अश्विनसोबत बोलताना रोहितने हे सांगितले होते. मुंबईच्या टीमने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 च्या मोसमाचे जेतेपद पटकावले आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडीयन्स सर्वात यशस्वी संघ आहे.

संबंधित बातम्या:

IND vs WI वनडे-टी20 मालिकेवर कोरोनाचं सावट, संसर्ग टाळण्यासाठी BCCI चं मोठं पाऊल! IPL 2022: यंदाही आयपीएल परदेशात होणार? BCCI च्या मनात नेमकं काय चाललय? NZ vs BAN: काय फिल्डिंग केली, बांगलादेशने न्यूझीलंडला 1 चेंडूत दिल्या 7 धावा, पाहा VIDEO

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.