
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली. या स्पर्धेत टीम इंडियाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं होतं. पण एका फोटोमुळे जोरदार चर्चा रंगली होती. या फोटोतील गूढ गेली चार वर्षे कायम होतं. या फोटोत एमएस धोनी, जसप्रीत बुमराह, मयांक अग्रवाल, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या दिसत आहे. हा सेल्फी हार्दिक पांड्याने घेतला होता आणि सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता. त्यामुळे कमेंट वाचल्यानंतर या फोटोत काहीतरी रहस्य आहे, अशी चर्चा रंगली होती. या फोटोला हार्दिक पांड्या याने बॉईज डे आऊट असं कॅप्शन दिलं होतं. फोटोत पाच जण दिसत आहेत. पण ऋषभ पंत यांच्या खांद्यावर ठेवलेला हात कोणाचा याबाबत प्रश्न पडला होता. आता कुठे चार वर्षांनी या प्रश्नाची उकल झाली आहे.
हार्दिक पांड्या याने हा फोटो 4 जुलै 2019 ला पोस्ट केला होता. भारताने बांगलादेश सामन्यापूर्वी हा फोटो समोर आला होता. ऋषभ पंत याच्या खांद्यावर हात कोणाचा आहे? धोनीचे दोन्ही हात स्पष्टपणे दिसत आहेत.बुमराहने दोन्ही हात धोनीच्या खांद्यावर ठेवले आहे. तर मयांक अग्रवाल एकदम पाठी उभा आहे. त्यामुळे इतक्या लांबून हात ठेवणं शक्य नाही, अशी थेअरी मांडण्यात आली.
‼️‼️After years of extensive research, debates, and countless conspiracy theories, let the nation finally know : it is MY hand on @RishabhPant17 shoulder ‼️‼️
Ps : any and all other claims are misleading and not true 😎 pic.twitter.com/nmOy9Ka0pH
— Mayank Agarwal (@mayankcricket) September 28, 2023
अखेर या कोड्याचं उत्तर खुद्द मयांक अग्रवाल याने दिलं आहे. ट्विटरवर त्याने याबाबतचा खुलासा केला आहे. “बरीच वर्षे शोध घेतल्यानंतर, चर्चा आणि थेअरी मांडल्यानंतर मी देशाला यामागचं खरं सत्य सांगणार आहे. हा हात माझा असून मी ऋषभ पंतच्या खांद्यावर ठेवला आहे” , असं मयांक अग्रवाल याने सांगितलं. तसेच या फोटोबाबत ज्या अफवा उडाल्या आहेत त्या सर्व खोट्या आहेत, असंही त्याने पुढे सांगितलं.
जखमी विजय शंकर याच्या जागी मयांक अग्रवाल याला संघात संधी मिळाली होती. अष्टपैलू विजय शंकर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना खेळला होता. मात्र पायाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आणि बरी होण्यासाठी 3 आठवड्यांचा अवधी पाहीजे होता. त्यामुळे 1 जुलैला आयसीसीने अग्रवालची रिप्लेसमेंट दिली.