
मुंबई : आयपीएल स्पर्धेत आता बऱ्याच घडामोडी घडत आहेत. काही विक्रम मोडले जात आहेत. काही विक्रम नव्याने रचले जात आहेत. काही संघांची कामगिरी सुमार राहिली आहे. या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची हवी तशी झाली नाही. त्यामुळे मुंबईचा संघ आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माबाबत विराट कोहली एक मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांना ही बाब महिती नसावी पण याबाबत विराट कोहलीने खुलासा केला आहे. त्याच्या विसरभोळेपणाबाबत विराट कोहलीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
विराट कोहलीने गौरव कपूर याच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनमध्ये हा खुलासा केला होता. तेव्हा त्याने सांगितलं होतं की, रोहित शर्मासारख विसरभोळा माणूस मी अद्याप पाहिलेला नाही. पाच वर्षे जुना विराटचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Virat Kohli about Rohit Sharma, in response to a question about who tend to forgot things most…#INDvNZ #NZvsIND #RohitSharma #HardikPandya? #ViratKohli #Shardulthakur #UmranMalik #siraj #INDvAUS pic.twitter.com/0kTWW4euV3
— CC (@CC_Venture) January 21, 2023
विराट कोहलीने सांगितलं होतं की, “रोजच्या वापरातील अनेक गोष्टी रोहित विसरून जातो. खरं सांगायचं तर मी त्याच्यासारखा विसरभोळा माणूस अद्याप पाहिलेला नाही. लॅपटॉप, मोबाईल रोहित सर्व काही विसरून जातो. आणि नंतर सांगतो जाऊ दे मी नवीन घेईन.”
विराट कोहलीने पुढे सांगितलं की, “तो कधी काय विसरेल सांगता येत नाही. संघाचा बसमधून अर्धा प्रवास झाल्यावर त्याला आठवतो की रुममध्ये आयपॅड किंवा काहीतरी विसरलो आहे. कित्येक वेळा तो पासपोर्ट विसरला आहे. त्याच्या विसरभोळेपणामुळे लॉजिस्टिक मॅनेजर त्यांना बस सुटण्यापूर्वीच सर्व सामान आहे का? याबाबत विचारतो. तरच आमची बस पुढच्या प्रवासाला निघते.”
रोहित शर्माचा विसरभोळेपणा न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला होता. दुसऱ्या सामन्यात टॉस झाल्यानंतर रोहित शर्मा विचार करताना दिसला. टॉस जिंकल्यानंतर नेमकं काय घ्यायचं याबाबत विचारलं त्याने सांगितलं की, काय निवडायचं हे मी विसरलो आहे.
रोहित शर्माने त्यानंतर गोलंदाजी निवडली होती. रोहित शर्माने तेव्हा सांगितलं की, टॉसबाबत संघासोबत दीर्घकाळ चर्चा रंगली होती. त्यामुळे नेमकं काय घ्यायचं कळलं नाही.