
1971 मध्ये वर्ल्ड प्लेइंग आणि ऑस्ट्रलियामध्ये सामना होता. या टीममध्ये फारुख इंजिनियर आणि सुनील गावसकर यांची निवड झाली होती. मेलबर्नच्या मैदानावर सामना होता. सुनील गावसकर टीम इंडियामध्ये नवीनच होते तर फारुख इंजिनियर हे त्यांचे सीनिअर होते. गावसकर खेळण्यासाठी मैदानात जात असताना त्यांना शून्यावर आऊट होऊन येऊ नको. कारण मेलबर्नचे पॅव्हेलियन दूर आहे असा सल्ला इंजिनियर यांनी दिला. पण झालं असं की त्या सामन्यामध्ये फारुख इंजिनियरच हेच शून्यावर आऊट झाले होते. 1986 मध्ये भारत आणि पााकिस्तानचा सामना शारजाहमध्ये होणार होता. या सामन्याआधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना ऑफर दिली होती. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान संघाचा पराभव केल्यावर सर्व क्रिकेटपटूंना कार भेट देईल, अशी ऑफर दिली होती. त्यावेळी कॅप्टन कपिल देव त्याच्यावर संतापला होता. त्याने दाऊदला तिथून निघून जायला सांगितलं होतं. या ऑफरबाबत दिलीप वेंगसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये...