
India vs South Africa, 4th T20I: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील निर्णायक सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजयेपी इकाना स्टेडियममध्ये होत आहे. पण हा सामना काही वेळेत सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे नाणेफेकीचा वेळ वारंवार पुढे ढकलण्यात आली. आता हा सामना होणार की नाही याबाबत शंका आहे. कारण मैदानाती दृश्यमानता खूपच कमी आहे. त्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करताना त्रासाला सामोरं जावं लागू शकतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल वारंवार लांबवला जात आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर हा सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते. असं असताना मैदानात हार्दिक पांड्या मास्क घालून उतरला होता. लखनौला असलेल्या प्रदूषणाच्या विळख्यामुळे मास्क घालून उतरल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर लखनौचं प्रदूषण 400च्या पार असल्याचा दावाही केला जात आहे. इतकं प्रदूषण असणं आरोग्यासाठी घातक आहे. कारण हा स्तर अत्यंत हानिकारक आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्याने काही काळ मास्क घातलं होतं. पण त्यानंतर विना मास्क मैदानात उतरला. तसेच इतर खेळाडूही मास्कशिवाय मैदानात उतरले. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंनी मास्क घातले नव्हते. हवामान वेबसाईटनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता लखनौचा AQI क्षमतेपेक्षा जास्त होता. लखनौ टी20 सामन्यासाठी टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होणार होता. पण तसं झालं नाही. दर अर्ध्या तासांनी पंचांकडून तपासणी केली जात आहे. आता रात्री 9 वाजता पुन्हा एकदा मैदानाचा आणि दृष्यमानतेचा अंदाज घेतला जाईल.
Captain Hardik Pandya spotted wearing a mask ahead of the match in Lucknow. The current AQI in Lucknow is 490 (hazardous). It’s downright dangerous for people to be playing sport in such conditions. pic.twitter.com/ygzZyDQET9
— Amar💫 (@KUNGFU_PANDYA_0) December 17, 2025
धुकं आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टी क्रिकेटसाठी भविष्यात मारक ठरू शकतात. कारण बहुतांश वनडे आणि टी20 सामने रात्री उशिरापर्यंत चालतात. अशा स्थितीत धुकं आणि प्रदूषणाची अशी स्थिती राहिली तर दिल्ली, लखनौ आणि चंदीगडमध्ये अर्थात उत्तर भारतात सामन्यांचं आयोजन करणं कठीण जाईल. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धा जवळ आली आहे. जर अशी स्थिती राहिली तर जगभरात नाचक्की होईल. 2023 त्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दिल्लीत झालेल्या बांग्लादेश श्रीलंका सामन्यापूर्वीही असाच प्रश्न उपस्थित झाला होता.दोन्ही संघांनी सराव सत्र रद्द केलं होतं. 2017 मध्ये श्रीलंकेचा संघाने दिल्ली कसोटी दरम्यान मास्क घातलं होतं.