ट्रेव्हिस हेडचे एकदा नाही तर दोनदा झेल पकडले, पण पंचांनी नाबाद केलं घोषित; का ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेतील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गोलंदाजी निवडली आणि हैदराबादला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 5 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं.

ट्रेव्हिस हेडचे एकदा नाही तर दोनदा झेल पकडले, पण पंचांनी नाबाद केलं घोषित; का ते जाणून घ्या
ट्रेव्हिस हेड
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 17, 2025 | 10:09 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 33व्या सामन्यात सनरायजर्य हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडेल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. सनरायझर्स हैदराबादचे आघाडीचे फलंदाज काही खास करू शकले नाहीत. इतकंच काय तर आघाडीचे चार फलंदाज षटकारही मारू शकले नाहीत. यात अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांचही नाव आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 40 धावांची खेळी करून बाद झाला. त्यामुळे ट्रेव्हिस हेडकडून फारच अपेक्षा होत्या. पण यावेळी वानखेडेवर बसलेल्या प्रेक्षकांना एक वेगळाच प्रसंगाची अनुभूती झाली. हार्दिक पांड्याच्या एका चेंडूवर दोन वेळा ट्रेव्हिस हेड बाद झाला. पण पंचांनी त्याला बाद दिलं नाही.

गोलंदाजीसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या समोर आला होता. तेव्हा आक्रमक पवित्रा दाखवत ट्रेव्हिस हेडने फटका मारला. चेंडू इतका वर होता आणि विल जॅक्सने कोणतीही चूक न करता पकडला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि चाहते नाचू लागले. पण तितक्यात सायरन वाजला आणि आनंदावर विरजण पडलं. मैदानातील पंचांनी नो बॉल असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर पुन्हा एकदा हार्दिक चेंडू टाकावा लागला. या चेंडूवरही हेडने जोरदार फटका मारला. सँटनरने झेल पकडला पण फ्री हिट असल्याने आऊट होण्याचा प्रश्नच नव्हता. हेडने एक धाव घेतली आणि स्ट्राईक बदलली.

ट्रेव्हिस हेडला दोन जीवदान मिळूनही काही खास करू शकला नाही. त्याने 29 चेंडूत 1 चौकार मारत 28 धावा केल्या. खरं तर त्याच्या स्वभावाला साजेसा हा खेळू बिलकूल नव्हता. ट्रेव्हिस हेडने 28 धावा करत एक विक्रम मात्र रचला. आयपीएलमध्ये सर्वात वेगाने 1000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.2024 मध्ये आयपीएल स्पर्धेत अंशुल कंबोजने ट्रेव्हिस हेडला असाच चकवा दिला होता. तसेच ऑफ स्टंप उडवला होता. पण पंचांनी त्याला नाबाद घोषित केलं. त्यामुळे जीवदान मिळालं होतं.