
टीम इंडियाने रविवारी 9 फेब्रुवारीला दुसर्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह ही मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता उभयसंघातील तिसरा सामना हा बुधवारी 12 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा विराट कोहली याला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडने ट्राय सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. केन विलियसमन हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. केनने या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आणि विराटचा मोठा रेकॉर्ड उद्धवस्त केला.
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 48.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. केन विलियमसन हा न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ठरला. केनने 113 बॉलमध्ये 13 फोर आणि 2 सिक्ससह नाबाद 133 धावांची खेळी केली. केनने या खेळीसह लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये इतिहास घडवला.
केनने या सामन्यात त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 14 वं शतक ठरलं. केनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे दुसरं सर्वात वेगवान शतक ठरंलं. तसेच डेव्हॉन कॉन्वहे आणि केन विलियमसन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 187 धावांची भागीदारी केली. केनने या दरम्यान 7 हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. केन वेगवान 7 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
केनने अवघ्या 159 डावांमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पार केला. केनने यासह विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला. केनने विराटच्या तुलनेत 2 डावांआधी 7 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने 161 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमला याने 150 तर मार्टिन गुप्टील याने 186 डावांमध्ये 7 हजार धावा पूर्ण केल्या.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके, जेसन स्मिथ, वियान मुल्डर, काइल व्हेरेन (विकेटकीपर), मिहलाली मपोंगवाना, सेनुरन मुथुसामी, एथन बॉश, ज्युनियर डाला, लुंगी एनगिडी आणि तबरेज शम्सी.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, बेन सियर्स आणि विल्यम ओरुर्के.