UAE vs AFG : 6,6,6,6,6,6, Muhammad Waseem ची वादळी खेळी, रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

Muhammad Waseem Break Rohit Sharma World Record : यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीम याने अफगाणिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं. वसीमने यासह आशिया कपआधीच धमाका करत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली.

UAE vs AFG : 6,6,6,6,6,6, Muhammad Waseem ची वादळी खेळी, रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
UAE Captain Muhammad Waseem
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 01, 2025 | 11:49 PM

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएईकडे आहे.आशिया कप स्पर्धेआधी यूएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20I ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीम याने अफगाणिस्तान विरुद्ध इतिहास घडवला आहे. वसीमने दुसऱ्या डावात स्फोटक खेळी करत भारतीय टी 20I संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

वसीमने रोहितचा टी 20I क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून सर्वाधिक सिक्स लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 189 धावांचा पाठलाग करताना वसीमने स्फोटक सुरुवात केली.वसीमला रोहितचा हा महारेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी अवघ्या 2 मोठ्या फटक्यांची गरज होती. वसीमने दुसऱ्याच षटकात फझलहक फारुकी याने टाकलेल्या बॉलवर खणखणीत षटकार लागवला. वसीमने यासह रोहितच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.

रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

वसीमने त्यानंतर तिसर्‍याच ओव्हरमध्ये मुजीब उर रहमान याने टाकलेल्या तिसऱ्या बॉलवर गगनचुंबी षटकार लगावला. वसीमने यासह रोहित शर्माला पछाडलं आणि टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा कर्णधार ठरला. वसीमने रोहितचा 105 षटकारांचा विक्रम मोडीत काढला.

कॅप्टन म्हणून टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार

एरोन फिंच – 82 सिक्स

इयोन मॉर्गन – 86 सिक्स

रोहित शर्मा – 105 सिक्स

मुहम्मद वसीम – 110 सिक्स

वसीमने पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत चौफेर फटकेबाजी केली. वसीमने पावरप्ले दरम्यान रोहितनंतर न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्टील याला मागे टाकलं. वसीमने यूएई विरुद्ध सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर वैयक्तिक पाचवा षटकार लगावला. वसीम यासह टी20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा दुसरा फलंदाज ठरला.

कॅप्टन मुहम्मद वसीम याची ऐतिहासिक कामगिरी

वसीमच्या फटकेबाजीमुळे यूएईला अफलातून सुरुवात मिळाली. वसीमने पाहता पाहता अर्धशतक पूर्ण केलं. वसीमने अर्धशतकानंतरही फटकेबाजी सुरुच ठेवत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे वसीमने अफगाणिस्तानचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र  अफगाणिस्तानसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या वसीमला शरफुद्दीन अश्रफ याने आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. वसीमने 37 बॉलमध्ये 181.08 च्या स्ट्राईक रेटने 67 रन्स केल्या. वसीमने या खेळीत 6 सिक्स आणि 4 फोर लगावले.