AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NEP | टीम इंडियाचा नेपाळवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय, पाकिस्तानला धक्का

India U19 vs Nepal U19 | सिनिअर टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेत नेपाळवर अशाच प्रकारे 10 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता अंडर 19 टीमने नेपाळ्यांचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.

IND vs NEP | टीम इंडियाचा नेपाळवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय, पाकिस्तानला धक्का
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 12, 2023 | 4:05 PM
Share

दुबई | अंडर 19 आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवत शानदार सुरुवात केली. मात्र रविवारी 10 डिसेंबर रोजी टीम इंडियाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियासाठी नेपाळ विरुद्धचा सामना हा स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या हिशोबाने करो या मरो असा होता. मात्र या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. टीम इंडियाने नेपाळचा धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानला दे धक्का दिला. राज लिबांनी हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

सामन्याबाबत थोडक्यात पण सविस्तर

टीम इंडियाने टॉक जिंकला. कॅप्टन उदय सहारन याने नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दीपक बोहरा आणि अर्जुन कुमल या सलामी जोडीने 9 धावा जोडल्या. राज लिंबानी याने दीपकला 1 धावेवर आऊट करत नेपाळला झटके द्यायला सुरुवात केली. राज इथून नेपाळला ऑलआऊट करुनच शांत राहिला. राजच्या धारदार बॉलिंगसमोर नेपाळच्या एकाही फलंदाजाला मैदानात उभं राहता आलं नाही.

नेपाळकडून दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर एकालाही दुहेरी धावसंख्या करण्यात यश आलं नाही. नेपाळकडून हेमंत धामी याने सर्वाधिक 8 धावा केल्या. तर अर्जुन कुमल आणि दीपक बोहरा या दोघांनी प्रत्येकी 7-7 धावांचं योगदान दिलं. राजच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळचा डाव 22.1 ओव्हरमध्ये 52 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 53 धावांचं माफक आव्हान मिळालं.

टीम इंडियाने हे 53 धावांचं आव्हान एकही विकेट न गमावता अवघ्या 43 बॉलमध्ये म्हणजे 7.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 57 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शीन कुलकर्णी याने 30 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 चौकारासह नाबाद 43 धावा केल्या. तर आदर्शने 13 बॉलमध्ये नाबाद 13 धावा करत अर्शिनला चांगली साथ दिली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कॅप्टन), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, आराध्या शुक्ला आणि राज लिंबानी.

नेपाळ प्लेईंग ईलेव्हन | देव खनाल (कर्णधार), अर्जुन कुमल, दिपक प्रसाद डुमरे, हेमंत धामी, उत्तम रंगू थापा मगर (विकेटकीपर), दीपेश कंडेल, आकाश चंद, सुभाष भंडारी, दीपक बोहरा, गुलसन झा आणि दीपक बोहरा.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...