U19 AUS vs ENG : थॉमस रेवचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार?

Australia vs England, U19 World Cup 2026 Semi Final 1st Innings Highlights : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्यासाठी इंग्लंडकडून 278 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. आता कांगारु हे आव्हान पूर्ण करणार की इंग्लंड या धावांचा बचाव करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

U19 AUS vs ENG : थॉमस रेवचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार?
U19 AUS vs ENG : थॉमस रेवचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार?
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 03, 2026 | 6:53 PM

अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (U19 World Cup 2026) उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कॅप्टन थॉमस रेव याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 277 धावा केल्या. इंग्लंडसाठी थॉमस व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला काही खास करता आलं नाही. एका बाजूला एकट्या थॉमसने किल्ला लढवला. तर दुसर्‍या बाजूला इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी आश्वासक सुरुवात मिळूनही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. अशात आता इंग्लंडचे गोलंदाज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल

इंग्लंडने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतर मधल्या फळीत कॅप्टन थॉमस रेव आणि इतर सहकाऱ्यांनी योगदान दिलं. त्यामुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियासमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं.

कॅप्टन रेवचा शतकी तडाखा

इंग्लंडसाठी थॉमस रेव याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रेव याने 97 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. रेवला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र रेव रन आऊट झाला. त्यामुळे रेवला शतकानंतर 10 धावा जोडून माघारी परतावं लागलं. रेवने 107 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकारासह 110 धावांचं योगदान दिलं. रेवनंतर केलेब फाल्कनर याने सर्वाधिक धावा केल्या. केलेबने 40 रन्स केल्या.

फरहान अहमद याने 26 चेंडूत नाबाद 28 धावा करत इंग्लंडला 277 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. जोसेफ मूर्स याने 33 चेंडूत 25 धावा केल्या. तर बेन मेस याने 24 रन्स केल्या. त्याव्यतिरिक्त इतरांना 20 पार पोहचता आलं नाही. राल्फी अल्बर्ट आणि सेबॅस्टियन मॉर्गन या दोघांनी प्रत्येकी 15-15 धावांचं योगदान दिलं.

ऑस्ट्रेलियाकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 4 गोलंदाज विकेट मिळवण्यात यशस्वी ठरले. हेडन शिलर आणि नाडेन कुरे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर विल बायरम आणि आर्यन शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

कोण कुणाला रोखणार?

दरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी 5-5 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी खेळलेले सर्व सामने जिंकलेत. त्यामुळे आता कोणता संघ कुणाला रोखण्यात यशस्वी ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.