AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : U19 टीम इंडियाची कडक सुरुवात, इंग्लंडचा पहिल्याच सामन्यात 6 विकेट्सने धुव्वा

England U19 vs India U19 1st Youth ODI :मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने वनडे सीरिजमध्ये विजयाने सुरुवात केली. भरारताने इंग्लंडवर शानदार विजय साकारला.

ENG vs IND : U19 टीम इंडियाची कडक सुरुवात, इंग्लंडचा पहिल्याच सामन्यात 6 विकेट्सने धुव्वा
Vaibhav Suryanshi and Ayush Mhatre U19 IND vs ENG 1st Odi Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 27, 2025 | 9:31 PM
Share

भारतीय कसोटी संघाला जे जमलं नाही ते अंडर 19 टीमने करुन दाखवलं आहे. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने काउंटी ग्राउंड, होवेमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंडर 19 इंग्लंडचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. यासह भारतीय क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंदु या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. तर इतरांनीही चांगली कामगिरी करत भारताच्या विजयात योगदान दिलं.

टीम इंडियाची कडक सुरुवात, आयुष-वैभवची फटकेबाजी

वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे या सलामी जोडीने कडक सुरुवात केली आणि टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. वैभव-आयुषने 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वैभव आऊट झाला. वैभवने 19 बॉलमध्ये 252.63 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केल्या. वैभवने या खेळीत 5 खणखणीत षटकार तर 3 चौकार लगावले. वैभवनंतर कर्णधार आयुषही झटपट आऊट झाला. आयुषने 30 चेंडूंमध्ये 4 फोरसह 21 धावा केल्या.

त्यानंतर विहान मल्होत्रा आणि मौल्यराजसिंग चावडा या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 20 धावा जोडल्या. मौल्यराजसिंग याने 15 बॉलमध्ये 16 रन्स केल्या. विहान आणि अभिज्ञान कुंदु या जोडीने चौथ्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी केली. भारताने विहानच्या रुपात चौथी आणि अखेरची विकेट गमावली. विहानने 21 चेंडूत 18 धावा केल्या.

पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

त्यानंतर अभिज्ञान आणि राहुल कुमार या जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 55 धावा जोडल्या. अभिज्ञानने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 45 धावा केल्या. तर राहुल कुमारने 25 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलं.

टीम इंडियाची विजयी सुरुवात

त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून एंड्रयू फ्लिंटॉफ याचा मुलगा रॉकी याने सर्वाधिक 56 धावांचं योगदान दिलं. तर इसाक मोहम्मद याने 42 धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता भारताच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाने अशाप्रकारे धारदार बॉलिंगच्या जोरावर इंग्लंडला 42.2 ओव्हरमध्ये 174 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताने 26 ओव्हरआधीच सामना जिंकला. टीम इंडियाने 24 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 178 धावा केल्या आणि पहिला विजय साकारला.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.