U19 World Cup : टीम इंडियासाठी धावून आला बीडचा सचिन धस, शतकी खेळी नेपाळवर पडली भारी

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत बीडचा सचिन धस चमकला. नेपाळविरुद्ध शतकी खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला. महत्वाच्या सामन्यात शतक ठोकून त्याने टीम इंडियाला दिलासा दिला. तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव सावरला. चौथ्या गड्यासाठी कर्णधार उदय सहारनसोबत 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.

U19 World Cup : टीम इंडियासाठी धावून आला बीडचा सचिन धस, शतकी खेळी नेपाळवर पडली भारी
U19 World Cup : बीडच्या सचिन धसने नेपाळच्या गोलंदाजांचा काढला घाम, शतकी खेळीमुळे टीम इंडियाचा डाव सावरला
| Updated on: Feb 02, 2024 | 5:01 PM

मुंबई : भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस याने चांगली खेळी केली. चौथ्या गड्यासाठी मोठी भागीदारी करत नेपाळच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अवग्या 62 धावांवर 3 गडी बाद असताना चौथ्या गड्यासाठी 200 अधिक धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. बीडच्या सचिन धसने 93 चेंडूत 100 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. सचिनच्या या खेळीमुळे त्याचं कौतुक होत आहे. ऐन मोक्याच्या क्षणी टीम इंडियाला सहारन धस या जोडीने सावरलं. दोघांनी चौथ्या गड्यासाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. सचिन धसने 101 चेंडूत 116 धावा करून बाद झाला. त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. गुलसन झाच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना दिपक बोहराने त्याचा झेल घेतला. त्यांच्या या खेळीमुळे भारताला 270 धावांचा पल्ला गाठता आला. तसेच नेपाळसमोर मोठं आव्हान देण्यात यश आलं आहे. आता हे आव्हान नेपाळला पेलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत आणि नेपाळ हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना भारताने जिंकला तर उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. तसेच ग्रुप ए मध्ये टॉपचं स्थान पटकावणार आहे. दुसरीकडे, टीम आतापर्यंत एकूण 4 सामने खेळली आहे. या चारही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर सुपर सिक्समध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 214 धावांनी धुव्वा उडवला आहे. उपांत्य फेरीत धडक मारली तर भारताचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे, आराध्य शुक्ला

नेपाळ अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता