AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 WC IND vs NEP : भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय, उपांत्य फेरीसाठी विजय महत्त्वाचा

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना होत आहे. हा सामना सेमीफायनलच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. भारताचा नेट रनरेट चांगला आहे. पण जर तरच गणित परवडणारं नाही. त्यामुळे हा सामना जिंकावाच लागेल. दरम्यान नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला.

U19 WC IND vs NEP : भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय, उपांत्य फेरीसाठी विजय महत्त्वाचा
U19 WC IND vs NEP : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, अशी आहे प्लेइंग इलेव्हन आणि उपांत्य फेरीचं गणित
| Updated on: Feb 02, 2024 | 1:29 PM
Share

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चारही सामन्यात विजय मिळवला आहे. सुपर सिक्समध्ये आता शेवटचा सामना नेपाळसोबत होत आहे. या सामन्यातील विजय उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणं खूपच गरजेचं आहे. तसेच हा सामना जिंकला तर ग्रुप 1 मध्ये टॉपला राहता येईल. त्यामुळे उपांत्य फेरीत ग्रुप 2 मधील संघाशी सामना होईल. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला असून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केलेला आहे.  नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार उदय सहारन म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. आम्ही येथे दोन वेळा खेळलो आहोत आणि आम्हाला ही विकेट देखील माहित आहे. आम्ही संघात एक बदल केलेला आहे.”

दुसरीकडे, नेपाळचा कर्णधार देव खनाल याने सांगितलं की,  गोलंदाजी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण ही खेळपट्टी फलंदाजी चांगली दिसत आहे, आज आम्ही तीन बदल केले आहेत. आम्हाला टॉप ऑर्डरकडू चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. आशा आहे की आज आमच्यात काही चांगली पार्टनरशिप होईल.’

आतापर्यंत भारताने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे नेपाळला पराभूत करून उपांत्य फेरी गाठेल. तसेच उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होण्याची शक्यता आहे. तर पाकिस्तानही उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. तर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत पाहायला मिळू शकते.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे, आराध्य शुक्ला

नेपाळ अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.